Jalgaon News : विद्यार्थ्यांना इंटर्नशिपतून अनुभव प्रदान करा : जिल्हाधिकारी

Jalgaon : विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देवून विकसित करावयाचे असेल तर त्यांना इंटर्नशिपच्या माध्यमातून अनुभव देता आले पाहिजेत.
Collector Ayush Prasad while inaugurating workshop on 'National Education Policy'.
Collector Ayush Prasad while inaugurating workshop on 'National Education Policy'.esakal

Jalgaon News : विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देवून विकसित करावयाचे असेल तर त्यांना इंटर्नशिपच्या माध्यमातून अनुभव देता आले पाहिजेत. महाविद्यालयांचे मेंटॉर आणि संस्थेचे मेंटॉर हे त्यावर ते काय काम करतील. याचे नियोजन करून आपण मांडणी केली पाहिजे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. (Jalgaon Collector Ayush Prasad statement Provide experience to students through internship)

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात एकदिवशीय विद्यापीठ स्तरीय कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्राचार्य परिषद आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे विद्यापीठ स्तरीय ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील अनुभवात्मक शिक्षण व अंतरवासीतेची संधी‘ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. पी. आर चौधरी आदी व्यासपिठावर उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, की विद्यार्थ्यांना चार टप्प्यांत शिक्षण देणे आवश्यक आहे. जसे ज्ञान, ज्ञानाचा उपयोग, विश्लेषण करण्याची क्षमता, नवीन सैध्दांतिक मांडणी या चार गोष्टीवर भर देण्यात यावा.

प्रत्येक टप्प्यातले शिक्षण देउन श्लेषण करायला शिकवले पाहिजे. प्राचार्य हे पद महाविद्यालय , शिक्षक आणि विद्यार्थी यांना एका सुत्रात ओवणारा महत्त्वाचा भाग आहे. प्रास्ताविकात सचिव डॉ. चौधरी यांनी, आतापर्यंत तीन टप्प्यांत आपण शैक्षणिक धोरणाकडे पाहत आलो. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांत धोरण राबवितांना महाविद्यालयांना विद्यापीठ आणि शासनाकडून योग्य ती मदत आणि मार्गदर्शन मिळावे. (latest marathi news)

Collector Ayush Prasad while inaugurating workshop on 'National Education Policy'.
Jalgaon News : प्रेमविवाहापूर्वीच युवक, युवती ताब्यात; मेहुणबारे पोलिसांकडून समुपदेशन

कुलगुरू प्रा.माहेश्वरी म्हणाले, की सर्वात अगोदर महाराष्ट्रामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात पुढे आहे. हे महत्वाचे निर्णय अंमलबजावणी करण्याचे निर्णय हे आपल्याच विद्यापीठाने घेतले आहेत.

इतकेच नाही तर विद्यार्थ्यांसाठी इंटर्नटशिप करणे, इंटरशिप करत असताना त्याच्यावरती कशा स्वरूपाची मदत देता येईल. त्यासाठी काही नियोजन करता येईल का. त्यासाठी विद्यार्थ्यांना मानधन देता येईल का ?यावर निर्णय घेणे महत्वाचे आहे.

यावेळी सेवानिवृत्त प्राचार्यांचा सत्कार , नवनियुक्त प्राचार्यांच्या सत्कार ६२/६५ मुदत वाढ झालेल्या प्रचारांचा सत्कार करण्यात आला. अतिथी सुकाणू समितीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव यांनी सर्व प्राचार्यांना अतिशय सूक्ष्म पातळीवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे नियोजन करण्यासाठी सूचना दिल्या. प्र कुलगुरू एस. टी इंगळे यांनी विचार मांडले. प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी आभार मानले. सूत्रसंचलन डॉ. नितीन बडगुजर यांनी केले.

Collector Ayush Prasad while inaugurating workshop on 'National Education Policy'.
Jalgaon News : शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार आज ठरणार; जळगाव लोकसभा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com