Jalgaon District Collector : उमेदवारांनी अर्ज भरताना 3 फोटो जोडावेत : जिल्हाधिकारी प्रसाद

Jalgaon News : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. नामनिर्देशन पत्रावर एक व त्यासोबत छायाचित्र सादर करण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.
Collector Ayush Prasad
Collector Ayush Prasadesakal

Jalgaon News : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. नामनिर्देशन पत्रावर एक व त्यासोबत छायाचित्र सादर करण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. संभाव्य अडचणी टाळण्यासाठी उमेदवारांनी छायाचित्र सादर करण्याबाबत अलीकडील ३ महिन्यांत काढलेले. (Jalgaon Collector Prasad statement Candidates should attach 3 photographs while filling application form)

छायाचित्र सादर करण्यासोबतच निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले निर्देश पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. उमेदवारांनी नामनिर्देशन अर्जासोबत सादर केलेले छायाचित्र निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा नमुना ‘७ अ’मधील यादीवर व सर्व मतपत्रिकांवरही छापण्यात येणार आहे.

त्यामुळे उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी छापील छायाचित्रासोबतच छायाचित्राची सॉफ्टकॉपी तीन जळगाव मतदारसंघाबाबत collector.jalgaon@maharashtra.gov.in व रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत adcjalgaon@gmail.com या ई-मेल आईडीवर सादर करावीत. सोबत उमेदवाराचे नाव नमूद करावे.

सॉफ्टकॉपी स्वरूपात उमेदवारांनी ई मेलवर सादर केलेले छायाचित्र भारत निवडणूक आयोगाच्या विविध पोर्टलवर, तसेच मतपत्रिकेवर छपाईकामी वापरात येणार असल्याने उमेदवारांनी खालील बाबींची दक्षता घ्यावी. (latest marathi news)

Collector Ayush Prasad
Jalgaon District Collector : काळ्या यादीतील कंत्राटदार, शिक्षा झालेल्यांचे अर्ज होणार बाद : जिल्हाधिकारी प्रसाद

छायाचित्राबाबत महत्त्वाचे मुद्दे

नामनिर्देशन पत्रावरील छायाचित्र व सॉफ्टकॉपीसारखी असावी. छायाचित्र अलीकडील किमान तीन महिने कालावधीतील म्हणजेच अधिसूचनेच्या तीन महिन्यांच्या कालावधीपूर्वी काढलेले असावे. छायाचित्र दोन सेमी रुंदी व अडीच सेमी उंचीचे असावे.

छायाचित्र काढताना उमेदवाराचा संपूर्ण चेहरा कॅमेऱ्याकडे असावा, डोळे उघडे असावेत व चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नसावेत. छायाचित्र रंगीन किंवा कृष्ण धवल असेल तरी चालेल. छायाचित्र साधारण कपड्यात काढलेले असावे.

कोणताही विशिष्ट पोषाख परिधान केलेला नसावा, तसेच टोपी, काळ्या काचेचा चष्मा घातलेला नसावा. छायाचित्र सादर करताना विहित नमुन्यातील घोषणापत्रासोबत सादर करावे.

Collector Ayush Prasad
Jalgaon Lok Sabha Election : आश्वासनांची खैरात, विकासाचा भुलभुलैय्या! पारोळा तालुका परिपूर्ण होण्याची प्रतीक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com