Jalgaon Crime News : चिंचोली केंद्रावर कॉपीप्रकरणी 5 जणांवर गुन्हा

Jalgaon Crime : यावल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी दहावीच्या पेपरला कॉपीचा प्रकार उघडकीस येउन गुन्हा दाखल झाला.
Crime
Crime esakal

Jalgaon Crime News : यावल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी दहावीच्या पेपरला कॉपीचा प्रकार उघडकीस येउन गुन्हा दाखल झाला. चिंचोले केंद्रावर काल उपविभागीय पोलिस आधिकाऱ्यांच्या सर्तकतेनंतर शिक्षण विभागाने कॉपी पथकाने कारवाई केली.

चिंचोली (ता.यावल) येथील सार्वजनिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी (ता.९) दहावीचा पेपर सुरु असतांना फैजपूर उपविभागीय कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी दुपारी दोनला जात असतांना वर्ग क्रमांक ५ वर्ग क्रमांक ६ आणि वर्ग क्रमांक ११ मधून विद्यार्थिनींनी कॉफीचा कागद बाहेर फेकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. (Jalgaon Crime against 5 persons in case of copying at Chincholi center)

त्यांनी तातडीने शिक्षणाधिकारी यांना सूचना करीत केंद्रप्रमुख सह पर्यवेक्षक अशा ५ जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ऐन पेपर संपण्याच्या वेळी दोन्ही ठिकाणी कारवाई झाल्याने तणावत आलेल्या पर्यवेक्षकासह शिक्षक थेट पोलिस ठाण्यात जमले.

शिक्षक पोलिस ठाण्यात

एका बाजूला गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या फिर्यादीवरून केंद्र प्रमुख बाळू पितांबर पाटील, केंद्र उपप्रमुख सतीश रामदास पाटील, पर्यवेक्षक विनायक दगडू कोष्टी, पर्यवेक्षक कल्याणी राहुल महाले, पर्यवेक्षक स्वीटी विनायक पवार या पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला तर त्याचवेळी पोलिस ठाण्यात जमलेल्या शिक्षक आणि त्यांच्या संघटनाच्या पदाधिकाऱ्यांच्या मात्र, कारवाई विरोधात तीव्र भावना होत्या.

विद्यार्थ्याने कागद जरी बाहेर फेकला तरी तो कॉपीचा आहे असे ग्राह्य धरून थेट केंद्रप्रमुख, शिक्षक पर्यवेक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करणे हे चुकीचं आहे. हे तर एका प्रकारे शिक्षकांना वेठीस धरले जात असल्याची व्यथा माडंली.

Crime
Crime News: आंबे चोरण्याचा संशयातून महिलेवर गोळी झाडत केला हल्ला

सलग दुसरी कारवाई

फैजपूर उपविभाग कार्यालयाच्या सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी सातत्याने ही दुसरी कारवाई केली आहे. यापूर्वी त्यांनी यावल शहरातील डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल या केंद्रात कारवाई केली होती व आता चिंचोली येथे कारवाई करीत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या एकूणच त्यांनी केलेल्या या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

पारदर्शकता हवी

कॉपीला प्रतिबंध करा पण अशा प्रकारे पेपर सुटतांना येवुन वर्गा बाहेर कागद अर्थात कॉपी विद्यार्थ्यांने फेकली सांगून केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक शिक्षकांवर गुन्हे दाखल करणे योग्य नाही. कॉपीला समर्थन नसुन किमान कारवाईत पारदर्शकता दिसु द्या अशा संतप्त प्रतिक्रीया शिक्षकांनी दिल्या.

Crime
Nagpur Crime: कारागृहातून सुटले, घरफोडी करायला लागले...दोघांना अटक ; सहा गुन्ह्यांचा उलगडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com