Jalgaon : सातपुडा ऑटोमोबाईल संचालकाच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

robbery

Jalgaon : सातपुडा ऑटोमोबाईल संचालकाच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न

जळगाव : शहरातील रिंग रोडवरील अजय कॉलनीतील रहिवासी तथा सातपुडा ऑटोमोबाईल्सचे संचालक किरण बच्छाव यांच्या घरावर रात्री नऊच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला चढवला. पिस्तूल लावून बच्छाव दांपत्यास लुटण्याच्या प्रयत्नात असताना, आरडाओरड झाल्याने दरोडेखोरांनी पोबारा केला.

हेही वाचा: Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

सोमवारी (ता. १४) रात्री आठच्या सुमारास किरण बच्छाव, त्यांची पत्नी व मुलाचे जेवण अटोपले. नऊच्या सुमारास घराच्या मुख्य दाराची बेल वाजली. सौ. बच्छाव यांनी दार उघडताच हातात पिस्तूल, शस्‍त्रासह तोंडावर मास्क लावलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी एका मागून एक घरात प्रवेश केला. किरण बच्छाव यांना पिस्तूल लावून हातपाय बांधत असताना, अचानक आरडाओरड झाल्याने दरोडेखोरांनी घरातून पळ काढला.

हेही वाचा: Jalgaon News : दुसरा विवाह करूनही पहिलीतच जीव गुंतला! कौटुंबिक वादातून पत्नीचा छळ

रस्त्यावर आढळली बॅग

घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक संदीप गावित यांच्यासह गुन्हे शाखा, जिल्‍हापेठ आणि रामानंदनगर पोलिस ठाण्याचा फौजफाटा बच्छाव यांच्या घरी धडकला. परिसराची पाहणी करीत असताना, दरोडेखोर पळून गेलेल्या रस्त्याने एका ठिकाणी बॅग मिळून आली. त्यात मिरचीची पुड, दोर आणि हातोडी, स्क्रू ड्रायवर मिळून आले. रात्री उशिरापर्यंत पोलिस परिसरातील सीसीटीव्हीची धुंडाळणी करीत होते.

टॅग्स :Jalgaoncrime