Jalgaon Crime News : महिलेवर लैंगिक अत्याचार करून ब्लॅकमेलिंग

Jalgaon Crime : महिलेवर हॉटेल मधील अत्याचाराचे मोबाईल शूटिंग करून ब्लॅकमेल करत चार लाखांचे दागिने बळकाविल्या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
Crime
Crime esakal

Jalgaon Crime News : महिलेवर हॉटेल मधील अत्याचाराचे मोबाईल शूटिंग करून ब्लॅकमेल करत चार लाखांचे दागिने बळकाविल्या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. भूषण नीलेश पाटील (रा.खेडी,ता.जळगाव) असे संशयिताचे नाव आहे.

संशयित भूषण पाटील याने पिडीतेला हॉटेल कमल पॅराडाईज येथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत त्याचे मोबाईल शूटिंग व्हायरल करण्याची धमकी देत सतत अत्याचार करून तब्बल चार लाखाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेतले. (Jalgaon Crime Blackmailing a woman by harresting her)

Crime
Crime News: पतीला आला राग अन् गळा दाबून केली पत्नीची हत्या

म्हणणे ऐकले नाहीतर, तूला ठार मारीन अशा धमक्या दिल्या जात असल्याचा पिडीतेचा आरोप आहे. त्रास असाह्य झाल्यानंतर पिडीतेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर संशयिताविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहे.

सहीला नकार

संशयित भूषण पाटील याने लैंगिक अत्याचारानंतर शूटिंग करत ब्लॅकमेलिंग केलेच, पण पिडीतेला कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करण्यासाठी बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जागतिक प्रेम दिवस म्हणून साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाइन-डे च्या दिवशीच तिच्यावर अत्याचार करीत शुटींग करुन चौदा दिवसांपासून त्रास देत असल्या; तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Crime
Nashik Fraud Crime : कार पेटल्याचे भासवून संशयितांनी गंडविले; कार स्पार्क स्कॅम नाशिकमध्येही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com