Jalgaon Crime: शहापूरला डोक्यात दगड टाकून विधवा महिलेचा निर्घृण खून! संशयाने पछाडलेल्या प्रियकराचे कृत्य; संशयित अटकेत

Crime News : खुनाचा मुख्य सूत्रधार असलेल्या संशयित किरण संजय कोळी (वय २६, रा. तळेगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले.
Kiran Koli
Kiran Koliesakal

जामनेर : शहापूर (ता. जामनेर) येथे सोमवारी (ता. १) सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास विधवा महिलेचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. संगीता पिराजी शिंदे (वय ३६) असे मृत महिलेचे नाव आहे. खुनाचा मुख्य सूत्रधार असलेल्या संशयित किरण संजय कोळी (वय २६, रा. तळेगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले. (Jalgaon Crime Brutal murder of widow by throwing stone on head)

मृत महिलेचे संशयिताशी अनैतिक संबंध असल्याचेही सांगण्यात आले. त्यातूनच संशयिताला वेगवेगळ्या संशयाने पछाडले होते. त्यातच सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास संशयित महिलेच्या घरी आला. तिथे दोघांमध्ये काही वेळ ‘तू तू-मैं मैं’ झाली.

वाद विकोपाला गेल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या किरण कोळी याने महिलेच्या डोक्यात दगड टाकला आणि अन्य अवजड वस्तूनेही प्रहार केले. त्यात महिला जागीच गतप्राण झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किरण शिंदे फौजफाट्यासह घटनास्थळी पोचले.

Kiran Koli
Chhatrapati Sambhajinagar Crime : जमिनीच्या वादातून वडिलांना मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, संशयित हा घटनास्थळावरून पळून जात असताना शहापूरजवळच असलेल्या तळेगाव परिसरात निरीक्षक शिंदे व पथकाने ग्रामस्थांच्या सहकार्याने संशयिताला पकडले. संशयितावर सोमवार (ता. १)पासून नवीन लागू झालेल्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Kiran Koli
Chakan Crime : चाकण-तळेगाव मार्गावर 'या' सराईत गुंडाचा खून; डोक्यात कोयत्याने सपासप वार, दोघे आरोपी फरार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com