Jalgaon Crime News : दहावी परीक्षा गैरप्रकाराबाबत केंद्रप्रमुखांसह चौघांवर गुन्हा

Jalgaon Crime News : इंग्रजीच्या पेपरदरम्यान फैजपूर उपविभागीय सहाय्यक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णासिंग यांनी तपासणी केली असता, त्यांना एका ब्लॉकमधील विद्यार्थिनी कॉपीचा कागद बाहेर फेकताना दिसून आली.
Crime
Crime esakal

Jalgaon Crime News : येथील डॉ. झाकिर हुसेन उर्दू हायस्कूल या परीक्षा केंद्रावर गुरुवारी दहावीच्या इंग्रजीच्या पेपरदरम्यान फैजपूर उपविभागीय सहाय्यक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णासिंग यांनी तपासणी केली असता, त्यांना एका ब्लॉकमधील विद्यार्थिनी कॉपीचा कागद बाहेर फेकताना दिसून आली. (Jalgaon Crime case filed against four including head of center regarding 10th examination malpractice)

त्यांनी थेट गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करून केंद्रावरील केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक अशा चार जणांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. यावल पोलिस ठाण्यात परीक्षा केंद्रावर गैरप्रकाराबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. झाकिर हुसेन उर्दू हायस्कूलमध्ये दहावीचे परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावर गुरुवारी इंग्रजीचा पेपर होता.

तेव्हा येथे दुपारी दोनला श्रीमती अन्नपूर्णासिंग यांनी भेट देत तपासणी केली असता, त्यांना ब्लॉक क्रमांक ६ मध्ये एक विद्यार्थिनी कॉफीचा कागद वर्गाबाहेर फेकताना मिळून आली.

Crime
Delhi Crime: बायकोला धडा शिकवण्यासाठी बापानं घेतला २९ वर्षीय मुलाचा जीव! जिम ट्रेनर हत्येप्रकरणी मोठा खुलासा

त्यांनी थेट परीक्षेचे कामकाज पाहणाऱ्या गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांना संपर्क साधून यावल पोलिस ठाण्यात बोलवून घेतले.

त्यांच्या आदेशान्वये केंद्रावरील केंद्रप्रमुख एफ. एच. खान, केंद्र उपप्रमुख तुलसीदास चोपडे, ब्लॉक क्रमांक ६ चे पर्यवेक्षक एस. एस. सोनवणे, मुख्याध्यापक जी. एन. खान या चौघांविरुद्ध गटशिक्षणाधिकारी धनके यांच्या फिर्यादीवरून विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार तपास करीत आहेत.

Crime
Hingoli Crime News : अवैध वाळूप्रकरणी एका महिन्यात ३८ गुन्हे दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com