Jalgaon Crime News : दांपत्याचा प्रताप; रिक्षातून बकऱ्यांची चोरी; पोलिसांकडून दोघांना अटक

Jalgaon Crime : कासमवाडी भागातून वारंवार बकऱ्या चोरीला जात होत्या.
Sarfraz alias Sonu Saeed Khan, Rickshaw used for stealing goats
Sarfraz alias Sonu Saeed Khan, Rickshaw used for stealing goatsesakal

Jalgaon Crime : कासमवाडी भागातून वारंवार बकऱ्या चोरीला जात होत्या. काही दिवसांत १५ बकऱ्या चोरून फरारी झालेला सर्फराज ऊर्फ सोनू सईद खान या रिक्षाचालकासह व त्याची पत्नी मजीना सरफराज खान यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. हे दांपत्य बकऱ्या चोरण्यासाठी रिक्षाचा वापर करीत होते. रिक्षासह दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत इंदूबाई रामा माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Jalgaon crime couple was using rickshaw to steal goats)

पोलिस चोरट्यांचा शोध घेत असताना, सर्फराज खान व त्याची पत्नी मजीना खान यांनीच बकऱ्या चोरल्याची माहिती निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दीपक जगदाळ.

सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, सचिन पाटील, ललित नारखेडे, साईनाथ मुंढे यांनी या दांपत्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले व विचारपूस केली.

Sarfraz alias Sonu Saeed Khan, Rickshaw used for stealing goats
Crime News: महिलेसह दोघांना देशी पिस्तूल आणि काडतुसांसह अटक, स्थानिक पोलिसांची कारवाई

मात्र, दोघेही उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यांना पोलिसी प्रसाद दिल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीची एक बकरी व गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे.

Sarfraz alias Sonu Saeed Khan, Rickshaw used for stealing goats
Crime News: फ्लॅटचे दाखवले आमिश अन् झाली ५० लाखांची फसवणूक; पोलिसांनी केली अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com