Jalgaon Crime News : तांबापुरात गुंडाचा रात्रभर धिंगाणा; वयोवृद्धाच्या डोक्यात हाणला अवजार

Jalgaon Crime News : औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८० वर्षीय वृद्धाला घरात शिरून डोक्यात काहीतरी हत्यार मारून जखमी केले. ही घटना शनिवारी (ता. २०) मध्यरात्री घडली.
Crime
Crime esakal

Jalgaon Crime News : औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८० वर्षीय वृद्धाला घरात शिरून डोक्यात काहीतरी हत्यार मारून जखमी केले. ही घटना शनिवारी (ता. २०) मध्यरात्री घडली. तांबापुरा परिसरात काही दिवसांपासून मध्यरात्रीनंतर गुन्हेगारांची दहशत पसरली असून, रात्रभर निमुळत्या गल्ल्यांमधून सुसाट वाहने पळवून गोरगरीब रहिवाशांना मारहाण करण्यात येते. (Jalgaon Crime Gangster rampage all night in Tambaram)

तांबापुरा बिस्मिल्ला चौकातील एका वृद्धाच्या घरात शिरून चार ते पाच गुंडांनी हल्ला केला. घरात शिरून कोणाची माहिती वृद्धाला त्यांनी विचारली. मात्र, झोपेच्या धुंदीत असलेल्या वृद्धाला सांगता न आल्याने गुंडानी मारहाण करून मध्यरात्री धिंगाणा घातला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

तांबापुरात गेल्या काही दिवसांपासून गुंडाचा उपद्रव वाढला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांना वारंवार भ्रमणध्वनीवरून कळवूनही उपयोग होत नाही. रात्री धिंगाणा घालणाऱ्या गुंडाची माहिती पोलिस ठाण्यात कळवली, की पोलिस गुंडांना सोडून माहिती देणाऱ्याची विचारणा करीत सुटतात.

Crime
Navi Mumbai Crime: बेकायदेशीर वास्तव्य; १२ परदेशी नागरिकांची धरपकड, मूळ देशात पाठविण्याची कार्यवाही सुरू

परिणामी, गुंडाची तक्रार करणाऱ्यांनाच पोलिस कारवाई नंतर मार खावा लागत आहे. शनिवारी (ता. २०) रात्री एका ८० वर्षीय आजोबाच्या घरात शिरून चार ते पाच गुंडांनी शस्त्राचा धाक दाखवून मारझोड केली.

या प्रकरणी दुसरा दिवस उलटूनही पोलिसांत तक्रार नोंदवून घेण्यात आली नसल्याचे तक्रारदारांनी सांगितले.हद्दपार गुन्हेगार शारीक खाटीक, समीर गुच्चा, अशा हद्दपार गुन्हेगारांनी मला मारहाण केल्याचे जखमी वृद्धाने सांगितले.

Crime
Nashik Crime News : अवैध धंद्यांविरोधात शहर पोलिसांची धडक कारवाई; आचारसंहितेच्या महिनाभरात 38 लाखांचा मुद्देमाल जप्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com