Jalgaon Crime News : मोर नदीतून अवैध वाळू उपसा; पोलिसांकडून जेसीबी, 3 डंपर व 1 ट्रक्टर जप्त

Jalgaon Crime : यावल-भुसावळ रस्त्यावरील पुलाखाली अवैध जेसीबीच्या साह्याने गौण खनिज उत्खनन होत असल्याची माहिती फैजपूर उपविभागीय सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांना मिळाली.
Police with sand transporter.
Police with sand transporter.esakal

यावल : तालुक्यातील अंजाळे येथील मोर नदीपात्रात यावल-भुसावळ रस्त्यावरील पुलाखाली अवैध जेसीबीच्या साह्याने गौण खनिज उत्खनन होत असल्याची माहिती फैजपूर उपविभागीय सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांना मिळाली. त्यांच्या आदेशावरून यावलचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विनोदकुमार गोसावी. (Jalgaon Crime Illegal extraction of sand from Mor river)

उपनिरीक्षक सुनील पाटील व विनोद गाभणे, हवालदार अनिल इंगळे, गणेश ढाकणे, अशोक बाविस्कर, वासुदेव मराठे तेथे पोहोचले. घटनास्थळी एक जेसीबीसह तीन डंपर व एक ट्रक्टर व ट्रॉली पथकाला मिळून आली. पथकाने संपूर्ण वाहने, तसेच उपसा केलेली एक ब्रास वाळू, असा एकूण २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई मंगळवारी (ता. १६) सकाळी दहाच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी सहायक फौजदार नितीन चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात किशोर अशोक शंकपाळ (रा. अंजाळे).

Police with sand transporter.
Nandurbar Fraud Crime : दामदुप्पट योजनेचे आमिष दाखवून अनेकांना पावणेचार कोटींचा गंडा

रोहित लीलाधर जाधव (रा. राहुलनगर, भुसावळ), धनराज शांताराम सपकाळे (अंजाळे), विलास मुरलीधर कोळी (कठोरा), अजय खच्चर, शुभम कालू घोरपडे, शुभम दिलीप सपकाळे, कालू विठ्ठल घोरपडे (तिघे रा. अंजाळे) व विशाल भावलाल साळवे (रा. रमाईनगर, अकलूद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी तपास करीत आहेत.

Police with sand transporter.
Nashik Crime : सोशल मीडियावरील त्या आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी गुन्हा दाखल! उपनगर नाक्यावर रास्तारोको करणाऱ्या चौघांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com