Jalgaon Crime News : अवैध वाळू वाहतुकप्रकरणी अखेर गुन्हा

Jalgaon Crime : मांडवे खुर्द येथील नदीपात्रात काही दिवसांपासूनअवैध वाळू वाहतूक सुरू असल्याने त्याचा त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत होता.
Police Patil Sarita Patil informs Revenue while a sand transporter is being driven away.
Police Patil Sarita Patil informs Revenue while a sand transporter is being driven away.esakal

Jalgaon Crime News : मांडवे खुर्द गावाच्या बाजूला असलेल्या नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाला जाब विचारण्यास गेलेल्या महिला पोलिस पाटील सरीता संभाजी पाटील यांना हुलकावणी देऊन पळून जाणाऱ्या वाहनचालकावर महसूल विभागाने गुरुवारी (ता.१३) रात्री पहूर पोलिसात गुन्हा दाखल केला. (Jalgaon crime in case of illegal sand transport)

मांडवे खुर्द येथील नदीपात्रात काही दिवसांपासूनअवैध वाळू वाहतूक सुरू असल्याने त्याचा त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत होता. या अगोदर गावकऱ्यांनी संबंधित वाहतूक करणाऱ्या वाहनधारक व गावकऱ्यांमध्ये वादही झाले होते. महसूलचे मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या मध्यस्थीने वाद मिटविण्यात आल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.

ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार गुरुवारी (ता.१३) नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करून वाळू भरत असलेला ट्रॅक्टरचालक संशयित कल्पेश समाधान पवार (रा. ढालगाव) याला वाळू वाहतुकीबाबत जाब विचारण्यास गेलेल्या महिला पोलिस पाटील सरिता संभाजी पाटील यांना हुलकावणी देऊन ट्रॅक्टरचालक पळून गेला.

Police Patil Sarita Patil informs Revenue while a sand transporter is being driven away.
Mumbai Crime: 16 वर्षीय विद्यार्थ्याची परीक्षा केंद्रामध्ये धक्कादायक कृती; महिला पर्यवेक्षकाने पाहिलं, FIR दाखल

त्यांनी तत्काळ जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी आपबीती सांगून ‘जिओ टॅग’चे फोटो पाठविले असता जामनेर तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी एम. बी. तीर्थंकर यांनी स्थळाचा पंचनामा करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाविरुद्ध पहूर पोलिसात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल केला. अवैध वाळू वाहतूक केल्या प्रकरणी १२ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

Police Patil Sarita Patil informs Revenue while a sand transporter is being driven away.
Crime News: दोन हजारांची लाच भोवली; पोलिस उपनिरीक्षकाला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com