Jalgaon Crime : आंतरराज्यीय चोरट्याला भडगाव पोलिसांकडून अटक; दिल्ली, मुंबई, बंगळुरू कोलकत्ता राज्यात घरफोड्या

Crime News : १२ डिसेंबर २०२३ ला भडगावच्या विद्यानगरातील प्रकाश दत्तात्रय भोसले (वय ५९) यांचे बंद घर फोडून १० लाख ८६ हजार ४०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरीला गेले होते.
Superintendent of Police Dr. Maheshwar Reddy, Officers and Staff with seized stuff
Superintendent of Police Dr. Maheshwar Reddy, Officers and Staff with seized stuffesakal

Jalgaon Crime : आंतरराज्यीय चोरट्याला घरफोडीच्या गुन्ह्यात भडगाव पोलिसांनी अटक केली आहे. १२ डिसेंबर २०२३ ला भडगावच्या विद्यानगरातील प्रकाश दत्तात्रय भोसले (वय ५९) यांचे बंद घर फोडून १० लाख ८६ हजार ४०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरीला गेले होते. (Jalgaon Crime Interstate thief arrested by Bhadgaon Police)

याबाबत भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निरीक्षक पांडुरंग पवार, उपनिरीक्षक शेख डोमाळे, किरण पाटील, प्रवीण परदेशी, संदीप सोनवणे यांनी सात महिने तपास करून घरफोडी करणारा प्रशांत काशीनाथ करोशी (वय ३८, रा. इस्पुर्ली, ता. करवीर) याला वर्धा येथून अटक केली आहे. दहा लाखांच्या दागिन्यांपैकी पोलिसांनी ८ लाख ६४ हजारांचे सोने जप्त केले आहे.

आईचे सोने सांगून मोडले

संशयित प्रशांत करोशी याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरलेले सोने त्याने छत्तीसगढच्या सराफाला विक्री केले होते. माझ्या आईचे दागिने असून, मला आजारपण व बँकेचे हप्ते भरण्यासाठी पैसा लागत असल्याचे त्याने सराफाला सांगितले होते. चांदी बसमध्ये बसल्यावर रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्याचे त्याने सांगितले. चांदीचे वजनही जास्त असते आणि मोडायलाही त्रास होतो. कमी पैसे मिळतात, म्हणून चांदीचे दागिने नेहमी फेकून देतो, असे त्याने सांगितले. (latest marathi news)

Superintendent of Police Dr. Maheshwar Reddy, Officers and Staff with seized stuff
Chakan Crime : चाकण-तळेगाव मार्गावर 'या' सराईत गुंडाचा खून; डोक्यात कोयत्याने सपासप वार, दोघे आरोपी फरार

पंधरा मिनिटांत घरफोडी

जळगाव शहरात घरफोडीच्या बेताने पुण्यातून नाशिकमार्गे जिल्‍ह्यात शिरताना तो भडगावला पोचला. मात्र, उशीर झाल्याने त्याने प्रकाश भोसले यांच्या बंद घरातून अवघ्या पंधरा मिनिटांत दहा लाखांचा ऐवज चोरून नेला.

दरम्यान, चोरटा दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकत्ता, अशा मोठ्या शहरांमध्ये बंद घरे फोडतो. प्रवासासाठी एसी बोगी, पंचतारांकीत हॉटेल्समध्ये मुक्कामी राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, आजवर त्याने कर्नाटक आणि महराष्ट्रात जवळपास ५४ मोठ्या घरफोड्या केल्या आहेत. त्यातून एक ते दीड कोटीचा माल मिळविल्याचे पोलिसांना चौकशीत सांगितले.

Superintendent of Police Dr. Maheshwar Reddy, Officers and Staff with seized stuff
Chhatrapati Sambhajinagar Crime : जमिनीच्या वादातून वडिलांना मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com