Jalgaon Crime News : महिलेच्या गळ्यातून पोत तोडली; 6 तासांत संशयितांना अटक

Jalgaon Crime : महिलेच्या गळ्यातून दहा ग्रॅमची पोत तोडून चोरटा पसार झाल्याची घटना सोमवारी (ता. १३) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
crime
crimeesakal

Jalgaon Crime News : औद्योगीक वसाहत परिसरात काशिनाथ हॉटेल चौकात दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातून दहा ग्रॅमची पोत तोडून चोरटा पसार झाल्याची घटना सोमवारी (ता. १३) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर सहा तासांत एमआयडीसी पोलिसांनी संशयितांना अटक केली. ( jewellery theft from woman neck and Suspects arrested within 6 hours)

खुशी प्रवीण महाजन (वय ३०, रा. सुप्रीम कॉलनी) त्यांची आई लताबाई सखाराम पाटील यांच्यासोबत दुचाकीवरून अजिंठा चौफुलीकडून सुप्रीम कॉलनीकडे जात असताना, काशिनाथ चौफुली पेट्रोल पंपासमोरच सुसाट दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी खुशी महाजन यांच्या गळ्यातून १० ग्रॅमची मणी मंगळसूत्र तोडून पळ काढला. याबाबत खुशी महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

सहा तासांत गुन्हा उघडकीस

घटना घडताच एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या डीबी पथकासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन संशयितांचा शोध सुरू केला. तांत्रिक माहितीवरून चोरटे अट्टल गुन्हेगार असल्याची खात्री झाली. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार तांबापुरा, मेहरुण, रामेश्वर कॉलनीतील रेकॉर्डवरील संशयितांचा शोध सुरू करण्यात आला.

crime
Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीकडे बळजबरी प्रेमाची मागणी; तिघांविरोधात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल

उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, नीलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किरण पाटील, किशोर पाटील, राजेंद्र कांडेलकर, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, राहुल रगडे, छगन तायडे, योगेश बारी, राहुल पाटील यांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. संशयितांना बुधवारी (ता. १५) न्यायाधीश जी. आर. कोलते यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितांची तीन दिवस कोठडीत रवानगी केली.

ओळख परेड होणार

अटकेतील संशयितांवर खून, जबरी चोरी, हत्यार बाळगणे यांसह इतर गंभीर गुन्हे दाखल असून, एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या सहा तासांत गुन्हा उघडकीस आणला. संशयिताची ओळख परेड पूर्ण केल्यावर त्यांना पोलिस रिमांडवर घेत इतर गुन्ह्यांचा तपास लागण्याची शक्यता आहे.

crime
Jalgaon Crime News : प्लॉट विक्रीस नकारामुळे मुलाने केला आईचा खून; एरंडोलमधील घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com