Jalgaon Crime News : बहीण, प्रियकराला ठार मारणाऱ्या 5 जणांना जन्मठेप!

Jalgaon Crime : बहिणीला पळवून घेऊन जाणाऱ्या चोपडा येथील तरुणाला गोळ्या मारून ठार मारणाऱ्या व बहिणीचा गळा दाबून ठार मारणाऱ्या पाच जणांना अमळनेर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Crime
Crime esakal

अमळनेर : बहिणीला पळवून घेऊन जाणाऱ्या चोपडा येथील तरुणाला गोळ्या मारून ठार मारणाऱ्या व बहिणीचा गळा दाबून ठार मारणाऱ्या पाच जणांना अमळनेर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर दोघांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली. राकेश संजय राजपूत (रा. रामपुरा, चोपडा) १२ ऑगस्ट २०२२ ला रात्री साडेआठला सुंदरगढी येथील वर्षा समाधान कोळी हिला ‘माझ्याशी लग्न कर’, असे म्हणत पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होता. (Jalgaon Crime Life imprisonment for 5 people who killed sister and boyfriend)

त्यावेळी एक अल्पवयीन, त्याचा भाऊ, तुषार आंनदा कोळी आणि मित्र भरत संजय रायसिंग बाहेर आले. तुषारने राकेशला पकडले. त्या दोघांत भांडण सुरू झाले. राकेश शिवीगाळ करू लागल्याने सर्वांनी त्याला मारहाण करून घरात नेले. तेथे त्याचे रुमालाने तोंड बांधून अल्पवयीन मुलाने त्याला दुचाकीवर बसविले आणि मागे भरत रायसिंग याला बसवले.

बहीण वर्षा हिलाही मारहाण करून तिला मावसभाऊ तुषार कोळी हिच्या दुचाकीवर बसवले आणि मागे दुसऱ्या अल्पवयीनला बसविले. दोघांनी दुचाकी वराड फाट्यावर थांबविल्या. त्यावेळी रात्रीचे नऊ वाजले होते. राकेश झटका देऊन पळून जाऊ लागला. त्याला पकडले. पुन्हा तो झटका देत असताना, एकाने हातातील गावठी पिस्तुलने राकेशवर गोळी झाडली.

राकेश जागेवरच तडफडत असताना, वर्षा प्रतिकार करू लागल्याने अल्पवयीनने हातातील रूमालाने तिचा गळा दाबला आणि तिचा आवाज व हालचाल बंद झाली. संशयित स्वतः चोपडा पोलिस ठाण्यात हजर झाले व गुन्ह्याची कबुली दिली. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ॲड. नितीन मंगल पाटील यांनी त्यांच्या स्वतःच्या हॉटेलमध्ये विधी संघर्ष बालकाला फिर्याद देण्यास सांगून त्याच्या हातात बंदूक दाखवली.

Crime
Crime News: प्रशासन अलर्ट मोडवर; सार्वजनिक शांतता भंग केल्याने १,५८४ जणांवर कारवाई

आणि काही पुरावे नष्ट करण्याचा सल्ला दिला. ही बाब पोलिसांच्या चौकशीत उघड आली. रवींद्र कोळी यांनी जिवंत काडतुसे लपविले होते. पवन नवल माळी याने कपडे जाळून पुरावे नष्ट केले. या खटल्याची अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. सरकारी वकील ॲड. किशोर बागूल यांनी तब्बल २१ साक्षीदार तपासले.

वैद्यकीय अधिकारी आर. के. गढरी, मनोज पाटील, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज, आरोपी व वकिलांशी संवादचे सीडीआर रिपोर्ट, बलेक्टड अधिकारी, डीएनए रिपोर्ट ग्राह्य धरत न्यायधीश पी. आर. चौधरी यांनी आरोपी तुषार आनंदा कोळी (वय २३), भरत संजय रायसिंग (वय २२), बंटी ऊर्फ शांताराम अभिमन कोळी (वय १९), आंनदा आत्माराम कोळी (वय ५६), रवींद्र आंनदा कोळी (वय २०) यांना खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. शस्र कायदा ३, ७ व २५ प्रमाणे पाच वर्षे शिक्षा आणि एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. ॲड. नितीन मंगल पाटील (वय ४३), पवन नवल माळी (वय २२) यांना संगनमत करणे, पुरावा नष्ट करणे यानुसार कलम २०१ व ३४ प्रमाणे पाच वर्षे शिक्षा आणि हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून उदयसिंग साळुंखे, हिरालाल पाटील, नितीन कापडणे, राहुल रणधीर, विशाल तायडे यांनी काम पाहिले.

Crime
Nagpur Crime: मैत्रिणिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com