Jalgaon Crime News : जिल्ह्यात 24 लाखांपेक्षा अधिकचे मद्य जप्त; प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

Jalgaon Crime : जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितासंदर्भात प्रशासनाने विविध माध्यमातून कार्यवाही करणे सुरू केले.
Crime
Crime esakal

Jalgaon Crime News : जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितासंदर्भात प्रशासनाने विविध माध्यमातून कार्यवाही करणे सुरू केले असून, त्यात शस्त्र जप्ती, रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातूंची तपासणी सुरू केली आहे. या अंतर्गत जवळपास २४ लाखांहून अधिक किंमतीचे मद्य जप्त करण्यात आले आहे. (Jalgaon Crime Liquor worth more than 24 lakh seized in district)

आचासंहिता (१६ मार्चपासून) कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात विविध ठिकाणी १३६ गुन्हे नोंदविले आहेत. त्यातून ४९ हजार २५२ लिटर मुद्देमाल जप्त केला असून या दारुची किंमत जवळपास २४ लाख ८ हजारांहून अधिक आहे.

२७ शस्त्रे जमा होणे बाकी

जिल्ह्यात एकूण १,३२३ परवानाधारक शस्त्र असून, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र जमा करण्याचे आदेश जारी झाल्यानंतर आजपर्यंत ९८५ शस्त्रे विविध पोलिस ठाण्यांमध्ये जमा करण्यात आली आहेत, तर ११५ शस्त्रधारकांना सूट दिली आहे. चार शस्त्र जप्त केली आहेत, तर दोन परवाने रद्द केले आहेत. अद्यापपर्यंत २७ शस्त्र जमा होणे बाकी आहे.

तीन हजार जण ताब्यात

सीआरपीसीच्या प्रतिबंधात्मक कलमांतर्गत आतापर्यंत चार हजार ७०० प्रकरणे दाखल केली आहेत, तर तीन हजार २८७ जणांना अटक केली आहे.

Crime
Crime News: पत्नी अन् सात मुलांची कुऱ्हाडीने हत्या.. पोलिसांसमोर गुन्हा कबूल करत सांगितलं धक्कादायक कारण!

‘सी- व्हीजील’वर ६६ तक्रारी

जळगाव जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या एकूण ६६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी सत्यता पडताळून १२ तक्रारी वगळल्या, तर ५४ तक्रारींवर विहित काळात कार्यवाही करण्यात आली. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल, तर नागरिकांनी तिथला फोटो काढावा आणि तत्काळ सी व्हिजील ॲपवर अपलोड करावा.

असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे. ती तक्रार प्राप्त होताच विहित कालावधीत त्यावर कार्यवाही होते. अद्यापपर्यंत मीडिया सेलकडे एकूण दोन तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्या दोन्ही तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

Crime
Crime News: पोटच्या पोरीसोबत केले अश्लील चाळे, विनयभंगप्रकरणात पित्याला कारावास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com