Jalgaon Crime News : अमळनेरला हल्ल्यात 3 जखमी; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Jalgaon Crime News : पाच जणांनी लोखंडी हत्याराने तिघांवर वार करत जखमी केल्याची घटना शनिवारी (ता. १७) रात्री नऊच्या सुमारास घडली असून, याबाबत अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime
Crime esakal

Jalgaon Crime News : शहरातील स्टेशन रोडवर लहान मुलांच्या भांडणावरून पाच जणांनी लोखंडी हत्याराने तिघांवर वार करत जखमी केल्याची घटना शनिवारी (ता. १७) रात्री नऊच्या सुमारास घडली असून, याबाबत अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहन सातपुते यांनी अमळनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की शनिवारी सायंकाळी सातला मुलांच्या भांडणावरून वाद झाला होता. (jalgaon 3 injured in Amalner attack case has been registered against 5 people)

Crime
Nashik Crime News : गंगापूर हद्दीत अनोळखी युवकाचा खून! पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू

त्यात समझोता करून वाद मिटवला होता. मात्र रात्री नऊच्या सुमारास स्टेशन रोडवर लहान भाऊ अनिल सातपुते, मुलगा पंकज सातपुते, पुतण्या कल्पेश सातपुते व चुलत पुतण्या दीपक चौगुले आदी गप्पा मारीत बसलेले असताना चार, पाच जण हातात लोखंडी हत्यार घेऊन भाऊ व पुतण्यास शिवीगाळ करीत तुम्हाला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत योगेश राजपूत याने हातातील गुप्तीने कल्पेश सातपुते यास पोटावर वार केले.

सुमीत राजपूत याने हातातील चाकूने पंकज सातपुते याच्या मानेवर व उजव्या हातावर चाकूने वार केले. मुकेश परदेशी याने फायटरने अनिल सातपुते याच्या डोक्यावर वार केला तर राजेश परदेशी याने लोखंडी सळईने हातापायावर वार करून जखमी केल्याची घटना घडली.

याबाबत अमळनेर पोलिसांत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक भय्यासाहेब देशमुख तपास करीत आहेत.

Crime
Nashik Crime News : मित्रानेच काढला मित्राचा काटा! सराईत ठमकेच्या खून प्रकरणी दोघांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com