Jalgaon Crime News : फरारी तुरुंगाधिकाऱ्यास जळगावात अटक; बंदिवानाची हत्या प्रकरण

जिल्हा कारागृहातील बंदिवानाचा मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी दाखल खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी तुरुंगाधिकाऱ्यास अटक करण्यात आली आहे.
crime
crimeesakal

Jalgaon Crime News : जिल्हा कारागृहातील बंदिवानाचा मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी दाखल खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी तुरुंगाधिकाऱ्यास अटक करण्यात आली आहे. जितेंद्र शेनफडू माळी (रा. शेलवड, ता. बोदवड) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. तो गुन्हा घडल्यापासून फरार होता. (jalgaon jail officer accused of murder was arrested in connection with death of prisoner)

तीन वर्षांपूर्वी (१० व ११ सप्टेंबर २०२०) दरम्यान चिन्या उर्फ रवींद्र रमेश जगताप हा न्यायालयीन बंदी वैद्यकीय उपचारार्थ रुग्णालयात दाखल असताना त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूप्रकरणी सुरवातीला नशिराबाद पोलिस ठाण्याला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

तपासादरम्यान तत्कालीन कारागृह अधीक्षक पेटरस गायकवाड, तुरुंगाधिकारी जितेंद्र माळी, अण्णा काकड (रा. पानेवाडी, ता. नांदगाव, जि. नाशिक), अरविंद प्रकाश पाटील (रा. हिरापूर रोड, आदर्श नगर, चाळीसगाव) आणि दत्ता हनुमंत खोत (रा. गोसावीवाडी, पो. अंबी, ता. परंडा, जि. उस्मानाबाद) अशा पाच जणांनी त्याला मारहाण केल्याचे निष्पन्न झाले होते.

या मारहाणीमुळे गुन्हेगार चिन्या याचा मृत्यू ओढवला होता. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील अण्णा काकड, अरविंद पाटील व दत्ता खोत यांना या पूर्वीच अटक करण्यात आली आहे.

crime
Sambhaji Nagar Crime : ऊसतोडणीच्या वादातून महिलेचा खून ; ब्रम्हगाव येथील घटना,पोलिसांकडून तरुणास अटक

जितेंद्र शेनफडू माळी या तुरुंगाधिकाऱ्यास अटक करण्यात आली असून, तत्कालीन सबजेल अधीक्षक पेटरस गायकवाड फरार आहे. त्याची माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाणार आहे.

या गुन्ह्यातील फरार तुरुंगाधिकारी जितेंद्र माळी हा जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातून जाणार असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकाला सूचना दिल्या.

गुन्हे शोध पथक प्रमुख सलीम तडवी यांच्यासह मिलिंद सोनवणे, विनोद पाटील, समाधान पाटील, विकास पहुरकर आदींच्या पथकाने जितेंद्र माळी यास आकाशवाणी चौकातून अटक केली. पोलिस निरीक्षक डॉ. जयस्वाल व त्यांचे सहकारी पथक तपास करीत आहेत.

crime
Ichalkaranji Crime : दहावी परीक्षा अभ्यासाच्या ताणातून वाढदिनीच विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com