Fri, Feb 3, 2023

Jalgaon Crime News : घरात एकटी असल्याची संधी साधत महिलेचा विनयभंग; एकाविरुद्ध गुन्हा
Published on : 27 December 2022, 10:15 am
अमळनेर : घरात एकटी असल्याची संधी साधत एकाने महिलेचा विनयभंग करून तिला ठार मारण्याची धमकी दिली. ही सावखेडा येथे शनिवारी (ता. २४) सकाळी साडेदहाला घडली.
हेही वाचा: Jalgaon News : चाळीसगावला झालेल्या चोरीत नातजावई निघाला Mastermind
सावखेडा येथील एका विवाहितेचा पती कामावर आणि मुलगी शाळेत गेल्याची संधी साधत संशयित गणेश गोकुळ अहिरे याने तिचा हात धरून विनयभंग केला. महिलेने विरोध करताच त्याने तुझा पती बाहेर गेला, की तुला मारून टाकेल, अशी धमकी देऊ लागला.
हेही वाचा: Jalgaon News : ‘अपनी झलक... सबसे अलग...’साठी तरुणींची पसंती
महिलेने हात झटकून गल्लीत पळ काढला. त्याचवेळी संशयित गणेश हाही पळून गेला. महिलेच्या फिर्यादीवरून संशयित गणेश अहिरेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.