Jalgaon Crime News : चोपड्यात 11 कुंटणखान्यातून 50 तरुणींची सुटका

Jalgaon Crime : चोपडा शहरातील कुंटणखाना वस्तीवर ११ कुटुंणखान्यावर पोलिसांनी बुधवार (ता.२०) छापे टाकून केलेल्या कारवाईत ५० तरुणींची सुटका केली.
Crime
Crime esakal

Jalgaon Crime News : चोपडा शहरातील कुंटणखाना वस्तीवर ११ कुटुंणखान्यावर पोलिसांनी बुधवार (ता.२०) छापे टाकून केलेल्या कारवाईत ५० तरुणींची सुटका केली. या कारवाईच्या निमित्ताने चोपड्यात आसाम, कलकत्ता, बंगालसह नेपाळ भागातील मालकिणी वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे उघडकीस आले आहे. (Jalgaon Crime Rescue of 50 young women from 11 brothel in Chopda)

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या सूचनेवरून सुरु असलेल्या पोलिस कारवाईत अनेक धक्कादायक बाबीचा उलगडा झाला. आज स्वतः अधीक्षकांनी प्रेरणा सभागृहात पत्रकार परिषदेत माहिती दिली. अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, निरीक्षक धोंडीबा साळवे आदींसह मोठा फौजफाटा छापेमारीत सहभागी होता.

अकरा मालकीण अटकेत..

पोलिसांनी त्यांचे पंटर, सरकारीपंच, साक्षीदार सोबत घेउन या कारवाया केल्या. सायंकाळी सहापासून चाललेल्या कारवायांत रात्री उशिरापर्यंत पिडीत महिलांची ओळख परेड सुरु होती. काही दिवसांपूर्वी चोपडा-धरणगाव रस्त्यावर पाटचारीच्या शासकिय जागेवर झोपड्या टाकून चालणारा हा अवैध व्यवसाय आता खासगी जागेवर स्थिरावला आहे.

कुंटणखाना चालवणाऱ्या मालकीणीची पोलिसांनी जाहीर केलेली नाव बघता, बहुतांश या परप्रांतीय आहेत. शर्मिला काले तमंग (वय- ४८ वर्ष रा.नारायणवाडी ता.चोपडा), उषा युवराज धोटे (वय-४०) किरण हरी लांबा (वय-४०, होलशीमन काठमांडु नेपाळ),मिराबाई चिंतामण चौधरी (वय-४५ रा.गांधलीपुरा अंमळनेर),मंगलाबाई रमेश मराठे (वय- ५८).

Crime
Crime News: अवैध मासेमारी करणाऱ्या १० बोटी ताब्‍यात

नुरजहाँ बेगम अकबर शेख (वय-४८ आसमसोल ब्रम्हचारी विद्यालय कालीपुर गेट कोलकाता),आसमा बेगम अब्दुल्ला शेख (वय-३५ वर्ष अनंत बिल्डीग कळंबोली रोड रायगड), सुभद्रा पुम्या नायक (वय-४०),माया बाप बख्नु लांमा (वय-५४ सिक्कीम),संगीता जित बहादुर थापा (वय-५३),सुनिता देवी फौजी मंडल (वय-४० वर्ष रा. गोणगा अभय नगर कोलकाता)

जागा मालकाची लॉटरी..

अवैध धंदे चालणारी कुंटणखान्याची जागा खासगी मालकाची असून सहा महिन्यापूर्वीच पोलिसांनी येथे कारवाई केली होती. मात्र, पुन्हा परिस्थीती जैसे थे झाली. येथील घरांत वीज पाणी कनेक्शनही आढळले आहे. पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत नगरपालिका आणि वीज वितरण कंपनीला पत्र देऊन कनेक्शन तोडले जाणार असल्याचा दावा केला आहे. मात्र या निमित्ताने एवढ्या फोफावलेल्या या अवैध धंद्यामुळे पोलिस यंत्रणेच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

Crime
Nashik Fraud Crime : लग्न करून आली अन्‌ लाखोंच्या दागिन्यांसह रफूचक्कर झाली! हिरावाडीतील एकाला घातला गंडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com