Jalgaon Crime News : तिजोरी पळविणाऱ्या सुरक्षारक्षकाला अटक; 47 हजारांची रोकड हस्तगत

Crime News : शहरातील पिंप्राळा रोडवरील खान्देश सेंट्रलमधील स्टार सिनेमागृहातील सुरक्षारक्षकाने चक्क तिकीट विक्रीच्या रोकडसह तिजोरीच पळविल्याची घटना घडली.
Crime News
Crime Newsesakal

Jalgaon Crime News : शहरातील पिंप्राळा रोडवरील खान्देश सेंट्रलमधील स्टार सिनेमागृहातील सुरक्षारक्षकाने चक्क तिकीट विक्रीच्या रोकडसह तिजोरीच पळविल्याची घटना घडली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मनीष वाल्मीक पाटील (मूळ रा. टाकरखेडा, ह.मु. खोटेनगर) असे सुरक्षारक्षकाचे नाव आहे. त्याच्याकडून चोरलेला पूर्ण ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. (Jalgaon Crime Security guard arrested for stealing safe news)

स्टार सिनेमागृहात दिवसभर सिनेमागृहातील तिकीटांची विक्री करून गोळा झालेली ४७ हजारांची रोकड मॅनेजरच्या कॅबिनमधील तिजोरीत ठेवली होती. ती तिजोरी चोरट्याने मध्यरात्री चोरून नेल्याची घटना सोमवारी (ता. २९) उघडकीस आली. शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत घटनेचा उलगडा करून तिजोरी लांबविणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे.

शहरातील स्टार सिनेमागृहात वासुदेव काशिनाथ पाटील यांच्यासह हेमंत पाटील व आकाश चौधरी व्यवस्थापक आहेत. नेहमी प्रमाणे सिनेमागृहाची दिवसभरात तिकीटाची विक्रीतून मिळालेली रक्कम मॅनेजरच्या कॅबिनमधील तिजोरीत ठेवून त्याला कडीकोयंडा लावून रविवारी (ता. २८) सिनेमागृहाचा मुख्य दरवाजाला कुलूप लावून त्याची चावी रात्रपाळीचा सिक्युरीटी गार्ड मनीष भावसार यांच्याकडे देऊन ते रात्री दोनला गेले. (Latest Marathi News)

Crime News
Nashik Crime News : 2 वर्षांपासून फरार संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक; झटपट दुप्पट-तिप्पट रकमेचे आमिष

सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास हेमंत पाटील यांनी वासुदेव पाटील यांना फोन करून कॅबिनमध्ये ठेवलेली तिजोरी दिसत नसल्याचे सांगितले. त्यावरून तत्काळ वासुदेव जोशी, आकाश चौधरी त्याठिकाणी आले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, त्यात सोमवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास काळ्या रंगाचा रेनकोट घातलेला आणि तोंडाला पांढरा रुमाल बांधलेला चोरटा कॅबिनमध्ये येऊन तो तिजोरी घेऊन जाताना दिसला.

चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सिनेमागृहातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर तपासचक्रे फिरवून त्यांनी त्याठिकाणीच सुरक्षारक्षक असलेला मनीष वाल्मीक पाटील याला ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखविताच त्याने आपणच चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेला ऐवज हस्तगत केला आहे.

Crime News
Jalgaon News : रेकॉर्डवरील 6 गुन्हेगारांना अटक; एमआयडीसीचे कोम्बिंग ऑपरेशन यशस्वी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com