Jalgaon Crime News : बहिणीच्या लग्नाची शॉपिंग भोवली! फुले मार्केटमध्ये पर्स कापून दागिने लंपास

Crime News : भुसावळ येथील रहिवासी ज्योती सचिन खरात (वय ३०) गृहिणी शनिवारी जळगाव सराफ बाजारात सोन्याची पोत दुरुस्ती करण्यासाठी आल्या होत्या अन...
Crime News
Crime Newsesakal

Jalgaon Crime News : बहिणीचे लग्न असल्याने त्याची खरेदी आणि तुटलेली सोन्याची पोत दुरुस्तीसाठी आलेली भुसावळ येथील गृहिणीची पर्स कापून चोरट्यांनी १ लाख ३५ हजारांचे दागिने लंपास केले, तर दुसऱ्या घटनेत महिलेच्या पिशवीतील ३० हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवली. दोन्ही घटना शनिवारी (ता. १३) सायंकाळी फुले मार्केटमध्ये घडल्या. पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (Jalgaon Crime Shopping for sister wedding Purse jewels stolen at Phule Market marathi news)

भुसावळ येथील रहिवासी ज्योती सचिन खरात (वय ३०) गृहिणी शनिवारी जळगाव सराफ बाजारात सोन्याची पोत दुरुस्ती करण्यासाठी आल्या होत्या. खांद्यावरील मोठ्या पर्समध्ये छोट्या पाकीटात ही तुटलेली पोत ठेवली होती. पोत दुरुस्तीला जाण्यासाठी ज्योती खरात दुपारी टॉवर चौकात आल्या.

सुरवातीला त्यांनी फुले मार्केटमध्ये काही खरेदी करायची असल्याने मार्केटमध्ये शिरल्यावर खरेदी केली. तेथून केळकर मार्केट येत असताना, काही वेळातच अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स धारदार ब्लेडने कापून त्यातील पोत असलेले छोट्या पाकीटातील १ लाख ३५ हजार ५३५ रुपयांचे मणी- मंगळसूत्र, वाट्या असा ऐवज चोरून नेला.  (latest marathi news)

Crime News
Crime NEws: स्लॅब कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू; तर एक जण गंभीर, प्रकृती चिंताजनक

तीस हजारांची रोकड लंपास

दुसऱ्या घटनेत महिला चणे, फुटाणे विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. माल विक्री झाल्याने नवा माल घेण्यासाठी महिलेने घरातील रोकड व माल विकून आलेली रक्कम, असे ३० हजारांची रोकड पिशवीत भरून टॉवर चौकात आली. ही महिला चालत असतानाच चोरट्याने त्यांच्या पिशवीतील ३० हजारांची रोकड अलगद काढून घेत पसार झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Nagpur Crime News : फेसबुक फ्रेंडसोबत पत्नी पळाली; पतीची उच्च न्यायालयात धाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com