आई गेली दहाव्याच्या कार्यक्रमात अन्‌ एकुलत्या मुलाने घरात घेतला गळफास

दुपारच्या सुमारास घरात कोणीच नसल्याने जगदीश याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली
jalgaon crime update jagdish kudape commit suicide
jalgaon crime update jagdish kudape commit suicidesakal

जळगाव : आई नातेवाइकांकडे दहाव्याच्या कार्यक्रमाला गेली असल्याने १८ वर्षीय जगदीश सुखदेव कुडपे या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास तांबापूरा परिसरात घडली.जगदीश याच्या वडीलांचे निधन झाले असून त्याची आई मोलमजुरी करून आल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होती. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी जगदीश सुरत रेल्वे मालधक्क्य़ावर हमाली काम करत होता.

शनिवारी (ता. १९) नेहमीप्रमाणे सकाळी तो कामाला गेला परंतु त्याठिकाणी काम नसल्याने तो घरी निघून आला. त्यानंतर दुपारच्या सुमारास घरात कोणीच नसल्याने जगदीश याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. दुपारी जगदीशला बघण्यासाठी त्याचे मामा भरत हटकर त्यांच्या घरी आले असता. त्यांना आपल्या भाच्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी शेजारी रवींद्र हटकर यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून जगदीशला बाहेर काढीत शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत त्याला मयत घोषित केले. एकुलत्या मुलाचा मृत्यू झाल्याने त्याची आई संगीता यांनी एकच हंबरडा फोडला. त्याच्या पश्‍चात आई व दोन विवाहित बहिणी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com