Jalgaon News : ‘शॉर्टकर्ट’साठी तापी नदीपात्रातून जीवघेणा प्रवास

Jalgaon News : शेळगाव बॅरेजमधून तापी नदीपात्रात सध्या पाणी सोडले असल्याने खालील बाजूस वाहत्या पाण्याचे पात्र रुंदावले असून, पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे.
Motorists travelling through Tapi river bed to reach Jalgaon via Shelgaon.
Motorists travelling through Tapi river bed to reach Jalgaon via Shelgaon.esakal

यावल : शेळगाव बॅरेजमधून तापी नदीपात्रात सध्या पाणी सोडले असल्याने खालील बाजूस वाहत्या पाण्याचे पात्र रुंदावले असून, पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. परिणामी, शेळगाव मार्गे जळगाव येथे जाणाऱ्या वाहनधारकांना जीव धोक्यात घालून पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत आहेत. नदी पात्रात सिमेंट पाइप्स टाकण्याची मागणी करण्यात येत आहे.

शेळगाव मार्गे नागरिकांना जळगाव अंतर केवळ १५ ते २५ किलोमीटर पडत असल्याने अनेक वाहनधारक खोल पाण्यातून आपले वाहन घेऊन जात आहेत. मात्र वाहनधारकांना धोकेदायक ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत असून, वाहनधारकांना या वाहत्या पाण्यातून वाहन पलिकडे नेऊ नये, असे आवाहन केले जात आहे.

यावल तालुक्यातील नागरिकांना जळगावचे अंतर केवळ १५ ते २५ किलोमीटर असल्याने शेकडो वाहनधारक शेळगाव बॅरेज मार्गे जातात. शुक्रवारपासून धरणातून पाणी सोडले असल्याने नदीचे वाहत्या पाण्याचे पात्र रुंदावले असून, पातळीतही वाढ झाली आहे. (latest marathi news)

Motorists travelling through Tapi river bed to reach Jalgaon via Shelgaon.
Jalgaon Protest News : भुसावळला ट्रकखाली डोके ठेवून आंदोलन! सणासुदीत रस्त्याचे खोदकाम केल्याने ‘रास्ता रोको’

तरी काही जण धोका पत्करून माघारी न फिरता नदीपात्र ओलांडून पलीकडे जात आहेत. या नदीपात्रात वाहत्या पाण्यासाठी सिमेंट पाइप्स टाकून रस्ता करावा, अशी मागणी तालुकावासीयांकडून होत आहे.

हा रस्ता हंगामी असून, यावल -जळगाव हे अंतर केवळ २५ किलोमीटर असल्याने नदीपात्रातील धोका अवलंबून दररोज शेकडो वाहनधारक या रस्त्याचा वापर करीत आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी आहे.

Motorists travelling through Tapi river bed to reach Jalgaon via Shelgaon.
Jalgaon District Bank : जिल्हा बँकेच्या धोरणामुळे गटसचिवांना घरघर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com