
जळगाव : वेगवेगळ्या घटनांत दोघांचे 'मृतदेह' आढळले
जळगाव : शहरातील वेगवेगळ्या भागात दोन मृतदेह आढळून आले. या घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनांमागे घातपात आहे की, आणखी काही प्रकार याबाबत पोलिस तपास सुरु आहे.
या परिसरातील बंद पडलेल्या स्वीमिंग पूलमध्ये ५२ वर्षीय प्रौढाचा मृतदेह आढळून आला. रोहिदास मोतीलाल निकुंभ (रा. तांबापूरा) असे मृताचे नाव आहे. तांबापुऱ्यातील रहिवासी रोहिदास निकुंभ हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. रविवारी पगार झाला. ती रक्कम घरी दिल्यानंतर ते सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घराबाहेर निघाले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाही. सोमवारी सकाळी ११ वाजता काही नागरिकांना मेहरूण परिसरातील जे. के. पार्कजवळच्या बंद जुन्या स्वीमिंग पूलमध्ये एका प्रौढाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोलिस निरिक्षक प्रताप शिकारे यांना फोन करून माहिती दिली. त्यानुसार पोलिस कर्मचारी गणेश शिरसाळे व राहुल रगडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
चौकशीतून त्यांची ओळख पटली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कांचननगरातील लेंडी नाल्याजवळ अनोळखी तरुणाचा मृतदेह सोमवारी सायंकाळी आढळून आला होता. त्यांची ओळख पटली असून ज्ञानेश्वर नरहर दुसाने (वय-३०) रा. कांचन नगर, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे. ज्ञानेश्वर दुसाने याला काही महिन्यांपासून त्याला दारूचे व्यसन होते, अशीही माहिती समोर आली आहे. त्याच्या पश्चात वडील आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
Web Title: Jalgaon Dead Bodies Two Persons Found Swimming Pool Police Investigation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..