Jalgaon News : पंपावर जेवणाच्या पंगती, पेट्रोल-डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या रात्रभर रांगा...

Jalgaon Diesel Shortage : शहरासह परिसरात गेल्या दोन, तीन दिवसांपासून डिझेलची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. ज्यामुळे वाहनधारकांसह शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतीकामांना सुरुवात झाल्याने डिझेलची अत्यंत गरज भासत आहे.
Jalgaon Diesel Shortage

Jalgaon Diesel Shortage

esakal

Updated on

जळगावमधील धरणगाव येथील चोपडा रस्त्यावरील पेट्रोल पंपावर रणरणत्या उन्हात तब्बल दहा ते बारा तासांपासून थांबून असलेल्या शेतकरी ग्राहकांना पेट्रोलपंपाचे मालक चंदन पाटील यांनी थंडगार पाण्याची व्यवस्था दिवसभर केली होती. शिवाय सायंकाळी सुमारे चारशे ग्राहकांच्या भोजनाची व्यवस्था करुन माणुसकीचा हात दिला. त्यांच्या या औदार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com