Jalgaon News : अनिष्ट तफावतीतील सोसायटीच्या सभासदांना थेट कर्जपुरवठा; जळगाव जिल्हा बँकेचा शेतकरी हिताचा निर्णय

Jalgaon News : अनिष्ट तफावतीची रक्कम ५० लाखांच्या आत असल्यास विकास सोसायटीला जिल्हा बँकेने ‘आरबीआय’च्या नियमानुसार कर्जवाटप न करण्याचा निर्णय घेतला आहे.
Loan
Loan esakal

Jalgaon News : अनिष्ट तफावतीची रक्कम ५० लाखांच्या आत असल्यास विकास सोसायटीला जिल्हा बँकेने ‘आरबीआय’च्या नियमानुसार कर्जवाटप न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अशा संस्थांचे कर्जदार सभासद पीक कर्जापासून वंचित राहू नये, म्हणून बँकेने थेट कर्जवाटप सुरू केले आहे. शेतकरी हितासाठी हा निर्णय घेतला असून, सचिवांनी दिशाभूल करू नये, अशी माहिती जिल्हा सेंट्रल को-ऑप. स्टाफ युनियनने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. (Jalgaon Direct loans to society members in adverse situations Decision of District Bank in favor of farmers)

राज्यातील इतर जिल्हा बँकाही मागील पाच वर्षांपासून अनिष्ट तफावतीमधील संस्थांच्या कर्जदार सभासदांना थेट कर्ज पुरवठा करीत आहे. त्यामुळे त्या संस्थांची थकबाकी वसुली होत असल्याने त्यांचे अनिष्ट तफावतीमधील प्रमाण कमी होऊन काही संस्था अनिष्ट तफावतीमधून बाहेर आल्या आहेत. सोसायट्या अनिष्ठ तफावतीत येण्यास सचिव जबाबदार आहेत.

कारण ते नेहमी असहकार्य करून अडथळा निर्माण करतात. आपल्या बँकेचा एनपीए मोठ्या प्रमाणावर असल्याने तो कमी करण्यासाठी विकास संस्थांचे सचिव बँकेस आडमुठीचे धोरण ठेवल्यास बँकेचे कर्मचारी विकास संस्थांच्या कर्जदार सभासदांना थेट कर्जवाटप करण्यास सक्षम आहेत. (latest marathi news)

Loan
Jalgaon News : बोरी धरणाच्‍या आवर्तनामुळे 21 गावांना लाभ

जिल्ह्यातील कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची जिल्हा सेंट्रल को- ऑप बँक्स युनियनने दखल घेतली आहे. सचिवांनी शेतकरी सभासदांची दिशाभूल करु नये, असे या पत्रकात म्हटले आहे. युनियनचे सचिव सुनील दत्तात्रय पवार यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

Loan
Jalgaon News : अमळनेर बाजार समितीत 20 हजार क्विंटल मालाची आवक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com