

Girish Mahajan Wins Jalgaon Bank Seat
Esakal
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड झालीय. जामनेर विकास सोसायटी मतदारसंघातून गिरीश महाजन हे पहिल्यांदाच जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांच्याविरोधात भाजपच्याच एका कार्यकर्त्याने अर्ज दाखल केला होता. मात्र आता त्याच्या माघारीमुळे महाजन यांचा मार्ग मोकळा झाला.