Jalgaon Lok Sabha Code Of Conduct : झेंडे, बॅनर, पोस्टर भांडणाचे कारण : डॉ. महेश्‍वर रेड्डी

Jalgaon News : संपूर्ण राज्यात डीजेला बंदी असताना, आपल्याकडे सर्रास वाजवला जातो. आवाजाचा अतिरेक आरोग्याला घातक आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे दाखल करणार आहे.
Speaking at the district level peace committee meeting, Superintendent of Police Dr Maheshwar Reddy Collector Ayush Prasad Chief Executive Officer Ankit etc
Speaking at the district level peace committee meeting, Superintendent of Police Dr Maheshwar Reddy Collector Ayush Prasad Chief Executive Officer Ankit etcesakal

Jalgaon News : संपूर्ण राज्यात डीजेला बंदी असताना, आपल्याकडे सर्रास वाजवला जातो. आवाजाचा अतिरेक आरोग्याला घातक आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे दाखल करणार आहे. मिरवणुकीतील गर्दीची सर्वस्व जबाबदारी आयोजकांची आहे. शांतता कमिटी सदस्यांनी शांत न राहता स्वतः मिरवणुकांमध्ये हजर राहावे, अशी सूचना पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. (Jalgaon District Level Peace Committee Meeting Dr Maheshwar Reddy statement Flags Banners Posters Reason for Clash)

गुढीपाडवा, रामनवमी, डॉ. बाबासाहेब जयंती उत्सव, रमजान ईद, महात्मा फुले जयंती उत्सव येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शांतता समिती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते.

कविता नेरकर, मनपा उपायुक्त आदी उपस्थित होते. तब्बल अडीच ते पावणेतीन तास सुरू बैठकीत प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधींनी समस्या आणि अडीअडचणी मांडल्या. अप्पर अधीक्षक अशोक नखाते यांनी प्रास्तविकात बैठकीचा उद्देश आणि संकल्पना विशद केली.

संवेदनशील ओळख पुसायची आहे : डॉ. रेड्डी

शासन दरबारी असलेली संवेदनशील जिल्‍हा ही ओळख पुसायची असेल, तर प्रत्येकाला प्रयत्न करावे लागतील. आपल्या गावात मिरवणुका, मोठे धार्मिक कार्यक्रमात शांतता समिती सदस्यांचा सक्रिय सहभाग असणे अपेक्षित आहे. अप्रिय घटनेत गुन्हे दाखल झाल्यास त्याचे वाईट परिणाम तरुणांनाच जास्त भोगावे लागतात, हे तरुणांना समजावून सांगा.

डीजेचे वाढते प्रमाण घातक असून, प्रत्येक पोलिस ठाण्याला एक साऊंड डेसीमीटर दिले आहे. आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई करण्यात येईल. प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पाच हजार प्रतिबंधात्मक कारवाई, ७० तडीपार, १३ एमपीडीए कारवाया करण्यात आल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले. (latest marathi news)

Speaking at the district level peace committee meeting, Superintendent of Police Dr Maheshwar Reddy Collector Ayush Prasad Chief Executive Officer Ankit etc
Jalgaon News : अमळनेर बाजार समितीत 20 हजार क्विंटल मालाची आवक

सणांचा गोडवा वाढवा : जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद

भावनांवर नियंत्रण ठेवा. मिरवणुकांत वेळेसह नियंमाचे पालन करा. परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरू आहे. वीजखांब, बस व रेल्वेस्थानक शासकीय मालमत्ता असून, बॅनर व पोस्टरसाठीत्याचा उपयोग केल्यास दंड आकारण्यात येईल.

जिल्‍ह्यात आदर्श आचारसंहिता लागू असून, त्याचे पालन करा. डीजे वाजवण्यामुळे हार्टअटॅकचे प्रमाण वाढले आहे. तसे घडल्यास आणि मृताच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यास सदोष मनुष्य वधाचे गुन्हे संबंधितांवर दाखल होणार नाहीत, याची खबरदारी घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले.

महिलांचा सहभाग वाढवा : नेरकर

चाळीसगावच्या अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर म्हणाल्या, की काही चुकीचे होत असल्यास त्यावर आवाज उठवा. वाईट प्रवृत्तीविरुद्ध बोलायला सुरवात केली, तर अप्रिय घटना घडणारच नाहीत. समाजातील तुम्ही आमचे कान, नाक, डोळे आहेत. मिरवणुकीसह धार्मिक कार्यक्रमांत महिलांचा सहभाग जास्तीत जास्त प्रमाणात वाढवावा.

Speaking at the district level peace committee meeting, Superintendent of Police Dr Maheshwar Reddy Collector Ayush Prasad Chief Executive Officer Ankit etc
Jalgaon News : बोरी धरणाच्‍या आवर्तनामुळे 21 गावांना लाभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com