जळगाव : चार वर्षांत ३००० लोकांनी मृत्यूला कवटाळलं

जळगाव जिल्ह्यातील स्थिती; कोरोनाकाळात सर्वाधिक आत्महत्या
death
deathdeath

जळगाव : जगाला आपल्या मगरमिठीत घेतलेल्या कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे आकडेवारी समोर आली आहे. त्यात कर्जबाजारीपणा, नैराश्य, आजारपण आणि एकांतपणामुळे कंटाळून दीड हजार लोकांनी मृत्यूला कवटाळले आहे. एकूण चार वर्षाच्या अभ्यासात जिल्‍हाभरात दोन हजार ९७५ मृत्यू झाले असून आत्महत्त्येपूर्वीच या लोकांचे समुपदेशन झाले असते तर कदाचित संख्या कमी झाली असती अशी, शक्यता आहे. अशाच आत्महत्येच्या विचारांमध्ये असलेल्यांसाठी पोलिस दल आता हेल्पलाईन सुरु करत असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व श्री संतुलन कॉंन्सिलिंग सेंटरतर्फे वाढत्या आत्महत्यांवर अभ्यास करण्यात आला. यासाठी चार वर्षांच्या आत्महत्या झालेल्यांची सांखिकी माहिती संकलित करून त्यांचे विविध प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आले. वयोगटानुसार, महिला-पुरुष, ग्रामीण-शहरी यांसह आत्महत्येची कारणमीमांसा करून प्राप्त अहवालानुसार ही आकडेवारी थक्क करणारी ठरली. आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला असता अगदी किरकोळ कारणांसह व्यसनाधीनता, आजारपण आणि नियोजीत लक्ष गाठू न शकणाऱ्यांच्या आत्महत्या जास्त होत्या. सांखिकी माहिती उपलब्ध झाल्यावर आत्महत्येच्या पोलिस तपासात नमूद कारणांचे अवलोकन करून पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी मु. जे. विद्यालयाचे डॉ. बालाजी राऊत, आयएमआर महाविद्यालयाचे घनश्याम रामटेके आणि श्री संतुलनचे रागीब अहमद अशांनी अभ्यास करून घडणाऱ्या आत्महत्या कमी करण्याबाबतच्या उपाय योजना मांडल्या आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. मुंढे यांनी आत्महत्या रोखण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंगअंतर्गत भरोसा हेल्पलाईनच्या माध्यमातून आत्महत्येचा विचारात असलेल्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस दलाच्या ११२ या हेल्पलाईन सहीत एक स्वतंत्र कक्ष त्यासाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे.

कोरोनाकाळात मृत्यूला कवटाळले

देशात कोरोनाची लागण झाल्यानंतर मार्च-२०२० मध्ये कोरोना संक्रमणाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर संपूर्ण वर्षात ८१८ लोकांनी मृत्यूला कवटाळले. ही आकडेवारी दुसऱ्या वर्षीही कायम राहून २०२१ मध्ये ७४९ लोकांचा मृत्यू झाला. कोरोना काळात आत्महत्या करणाऱ्यांची कारणे वेगवेगळी असली तरी, याच काळात झालेलं लॉकडाऊन, बेरोजगारी आणि सतत घरातच कोंडून असल्याने पती-पत्नीचा वाद कौटुंबिक कलह आदी कारणेही समोर आली आहेत.

आत्महत्येत पुरुष अधिक

प्राप्त माहितीनुसार विविध वयोगटातील मृत्यूमध्ये १९ ते ४० वयोगटातील पुरुषांनी मोठ्या प्रमाणावर मृत्यूला कवटाळले असून त्या तुलनेत महिला नगण्य आहेत. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येचा निर्णय घेणारे सर्वाधिक असून त्यांच्यावर कुटुंबीयांची जबाबदारी आहे, अशाच लोकांची संख्या जास्त आहे.

वर्षनिहाय आत्महत्या.. कारणे

वर्ष....... कर्ज लग्न न कौटुंबिक कारण नशा नैराश्‍य रागात

झाल्याने नाही

२०१८ ३९ २३ ३४ २०० १४८ ७८ ३३

२०१९ ८२ १४ ६१ २५३ १२१ ६४ ५१

२०२० ४९ ३० ५१ २९८ १५६ ९० ४०

२०२१ ५६ १३ ५३ १७० १५३ १२० ८२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com