Jalgaon News : जळगावच्या डॉक्टर दांपत्याची विमानात रुग्णसेवा; इमर्जन्सी लॅन्डिग टळले

Jalgaon : लंडनहून मुंबईकडे झेपावलेल्या विमानात मध्यरात्री एका प्रवासाची प्रकृती अचानक बिघडून तो बेशुद्ध झाला.
Dr. Leena and Girish Narkhede
Dr. Leena and Girish Narkhede esakal

Jalgaon News : लंडनहून मुंबईकडे झेपावलेल्या विमानात मध्यरात्री एका प्रवासाची प्रकृती अचानक बिघडून तो बेशुद्ध झाला. विमानातील सहप्रवासी असलेल्या जळगावच्या डॉक्टर दांपत्याने तातडीने पुढाकार घेऊन या प्रवासावर प्रथमोपचार केल्याने तो शुद्धीवर आला. त्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लॅन्डिगही टळले. (Doctor couple from Jalgaon medical services in pune )

जळगावचे डॉक्टर दांपत्य डॉ. लीना व गिरीश नारखेडे काही व्यक्तिगत कामानिमित्त लंडनला त्यांच्या मित्राकडे गेले होते. बुधवारी (ता. ८) रात्री त्यांनी लंडनहून मुंबईला येण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने प्रवास सुरू केला. रात्री साडेबाराच्या सुमारास प्रवासादरम्यान विमानातील एका प्रवासाची प्रकृती अचानक बिघडली. प्रवासाचा रक्तदाब (बीपी) कमी होऊन तो बेशुद्ध झाला. याबाबत विमानातील यंत्रणेच्या माध्यमातून उद्‌घोषणा करण्यात येऊन कुणी डॉक्टर असेल तर बघावे, अशी सूचना मिळाली.

Dr. Leena and Girish Narkhede
Jalgaon News : मलकापूरची शेंदोडी पारोळ्यातील भाजी बाजारात ग्राहकांची मागणी

या विमानातून प्रवास करीत असलेल्या डॉ. लीना व डॉ. गिरीश नारखेडे यांनी पुढाकार घेत प्रवासाची तपासणी केली. त्यांचा रक्तदाब कमी झाला होता, पल्सरेटही घसरल्याचे डॉ. गिरीश यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रथमोपचार करत या रुग्णास काही औषधी दिल्या. काही वेळातच रुग्ण शुद्धीवर येऊन सामान्य झाला.

त्यानंतर या प्रवासाची विचारपूस करण्यात आली. जास्त अस्वस्थ वाटत असेल, तर इर्मजन्सी लॅन्डिग करू, असे त्यास सांगण्यात आले. मात्र, प्रकृती ठीक झाल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे लॅन्डिग टळले. पहाटे पाचला विमान मुंबई विमानतळावर आले आणि रुग्णासह, विमानसेवेतील स्टाफने सुटकेचा श्‍वास सोडला.

Dr. Leena and Girish Narkhede
Jalgaon News : भन्साळींसाठी जळगावची ‘पल्लवी’ ठरली छोटी सरोज खान! अभिनयाने केले प्रभावित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com