Jalgaon News : निम्मे मनुष्यबळावर दुप्पट कैद्यांच्या सुरक्षेचा भार! जळगाव जिल्‍हा कारागृहाची स्थिती; दोनशेच बंदिवानांची क्षमता

Jalgaon News : मंजूर संख्येपेक्षा निम्मे मनुष्यबळाकडे कारागृहाची सुरक्षा असल्याने जिल्हा कारागृहाचा कारभार अलबेला असल्याचे आजच्या खुनाच्या घटनेवरून अधोरेखित झाले आहे.
Jalgaon District Jail
Jalgaon District Jailesakal
Updated on

Jalgaon News : पंधरा तालुके आणि महानगर अशा लोकसंख्येत गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि अटक गुन्हेगारांना ठेवण्याची व्यवस्थाच जिल्‍हा कारागृहात नाही. परिणामी, २०० बंदिवानांची क्षमता असताना या कारागृहात दप्पटीपेक्षा अधिक बंदिवानांना कोंबून ठेवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मंजूर संख्येपेक्षा निम्मे मनुष्यबळाकडे कारागृहाची सुरक्षा असल्याने जिल्हा कारागृहाचा कारभार अलबेला असल्याचे आजच्या खुनाच्या घटनेवरून अधोरेखित झाले आहे. (Jalgaon Double security burden of prisoners with half manpower Status of District Jail)

१५ तालुके व महानगर असा जळगाव जिल्हा. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत गुन्हेगारीत दर वर्षी प्रचंड वाढ होत आहे. वाढती गुन्हेगारी आणि गुन्हे प्रकटीकरण आणि अटक गुन्हेगारांच्या संख्येत वाढ होत असताना परिणामी जिल्‍हा कारागृह मात्र नेहमीच ओव्हर-फ्लो झालेले असते. वेळप्रसंगी कैद्यांना इतरत्र हलविण्याची वेळ येते.

औरंगाबाद, नाशिक, धुळे मध्यवर्ती कारागृहांचीही परिस्थिती बिकट असून, त्यांच्याकडूनही कैद्यांना स्थलांतरासाठी नकार असतो. अशा परिस्थितीत जळगाव उपजिल्‍हा कारागृहात दुप्पटीपेक्षा जास्त बंदिवानांना कोंबून ठेवण्याची वेळ आली आहे. जिल्ह्याच्या तुलनेत धुळे जिल्ह्यात अवघे चार तालुके, नंदुरबार जिल्ह्यात सहा तालुके असताना तेथे वर्ग-१ चे कारागृहे आहे. जळगाव जिल्ह्याला मात्र आजवर वर्ग-२ वर ठेवण्यात आले आहे.

शस्त्रांसह अमली पदार्थ पुरवठा

कारागृहाच्या भिंतीवरून बॉलिंग करून गांजा, ड्रग्ज, पिशव्यांमध्ये भरून दारू आणि बिअरचे टिन पाठविण्यात येतात. कैद्यांसाठी मोबाईल आणि पिस्तूलही यापूर्वी पाठविण्यात आले आहे. बिडी-सिगारेट, तंबाखू अशीच खाण्याच्या डब्यात सहजच शंभर-दोनशे रुपये गेटवर देऊन पोचवली जातात, अशी माहिती समोर आली आहे.

कारागृहात चालते सिंडिकेट

कारागृहात गरजेप्रमाणे गांजा, बिडी- सिगारेट आणि दारू मागविण्यासाठी बंदिवानांमध्येही सिंडिकेटचा वापर होतो. आजच्या खुनाच्या घटनेतील मृत मोसीन खान हादेखील गांजा मागून देण्याची सोय करत असल्याची चर्चा आहे. (latest marathi news)

Jalgaon District Jail
बेळगावमधील 'या' सात प्रसिद्ध धबधब्यांना भेट देणार असाल, तर थांबा! वन विभागानं जारी केलाय प्रवेश बंदीचा आदेश

कारागृहातील आजपर्यंतच्या घटना

- २६ मे २०१६ कारागृहाची भिंत ओलांडून बंदिवान पसार

- २५ जुलै २०२० सुरक्षारक्षकाच्या डोक्याला पिस्तूल लावून तीन बंदिवान पळाले

- ११ सप्टेंबर २०२० चिन्या ऊर्फ रवींद्र रमेश जगताप बंदिवानाचा मृत्यू

- महिला बंदिवानाचा आत्महत्येचा प्रयत्न

- जेलमध्ये तीन बंदिवानांकडून एकास मारहाण

जेलमध्ये असा आला चाकू

बंदिवान मोहसीन खान याच्या हत्येसाठी शेखर मोघे याने वापरलेला चाकू हा कारागृहाच्या २३ फूट उंचीच्या भिंतीवरून आत फेकण्यात आल्याची माहिती अटकेतील शेखर मोघे याने प्राथमिक चौकशीत दिली आहे. परिणामी, कारागृहाची सुरक्षतेच्या संदर्भात पुन्हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

"घटनेची माहिती मिळाल्यावर तत्काळ कारागृहात जाऊन पाहणी केली. संशयित बंदिवान शेखर मोघे याच्या साहित्याची तपासणी केली असता त्यात एक धारदार कटर मिळून आले. गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे."- कृष्णकांत पिंगळे, विभागीय पोलिस अधिकारी, भुसावळ-जळगाव

"२ जुलैला कारागृहातील सर्व बॅरेकमधील बंदिवानांच्या साहित्याची तपासणी केली गेली. त्या वेळी शस्त्र अथवा अन्य आक्षेपार्ह वस्तू आढळल्या नव्हत्या. हे शस्त्र भिंतीवरून फेकले गेले असण्याची शक्यता आहे."- अनिल वांढेकर, जिल्हा कारागृह अधीक्षक

जिल्‍हा कारागृह क्षमता व मनुष्यबळ

पुरुष बंदिवान - १८४ क्षमता

आजमितीस बंदिवान - ४६४

स्त्री बंदिवान - १६ क्षमता

आजमितीस - २०

-------------

मनुष्यबळ

कारागृह अधीक्षक -१

तुरुंगाधिकारी - ४ (रिक्त ३)

मंजूर पदे - ७९ : हजर- ४३, साप्ताहिक सुटी - ६ प्रतिदन, रजेवर- ३, निलंबित- ३

Jalgaon District Jail
Jalgaon Crop Crisis: चोपडा तालुक्यात ऊसावर पांढरी माशी! शेतकरी धास्तावले; उत्पादनावर परिणाम होण्याची भीती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.