Earthen Pots : आरोग्यासाठी हितकारक मातीच्या मडक्यांना पसंती; उष्माघाताला आळा घालण्यासाठी फायदेशीर

Jalgaon News : वॉटर फिल्टरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार चांगला असला, तरी घराघरांत मातीच्या मडक्यांना आजही तेवढीच मागणी असल्याचे चित्र सर्रास पाहावयास मिळत आहे.
Clay pots entered for sale.
Clay pots entered for sale.esakal

वावडे (ता. अमळनेर) : पिण्याच्या पाण्यापासून होणारे विविध आजार टाळण्यासाठी वॉटर फिल्टरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार चांगला असला, तरी घराघरांत मातीच्या मडक्यांना आजही तेवढीच मागणी असल्याचे चित्र सर्रास पाहावयास मिळत आहे. अमळनेर शहरासह ग्रामीण भागातही वॉटर प्युरिफायर घरोघरी पोहोचले आहेत. मात्र मडक्यातील पाणी चवदार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. (Jalgaon Earthen pots preferred for health Beneficial)

उन्हाच्या झळा वाढू लागल्याने मडक्यांची दुकानेही बाजारात व रस्त्या रस्त्यावर थाटली आहेत. आकारानुसार मडक्यांच्या किमतीत बदल आहेत. त्यामुळे खरेदीची धूम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गेल्या दोन-तीन दिवसांत उन्हाचा पारा जास्तच चढला आहे.

त्यामुळे थंड पाण्याची गरज भासू लागली आहे. विशेषत दुपारी उन्हाची तीव्रता जाणवत आहे. परिणामी, मातीच्या मडक्यांनाही मागणी वाढल्याचे चित्र आहे. अनेक घरांमध्ये फ्रीज असले तरी मडक्यांची जागा ही कायम आहे. 'जुने ते सोने' ही म्हण प्रचलित आहे.

मडक्यामध्ये पाणी ठेवल्यास त्यात नैसर्गिकरीत्या मॅग्नेशियम, पोटॅशियम ही खनिजे असतात. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. उष्माघात होण्यापासून बचाव होतो. माठ नैसर्गिकरीत्या थंड पाणी ठेवतो. उन्हाळ्यात सर्वांनी मडक्यातील पाणी प्यायल्यास आरोग्यास हितकारक राहत आहे. उन्हाच्या दाहकतेपासून वाचविण्यासाठी मातीच्या मडक्यातील पाण्यानेच तहान मिटते. (latest marathi news)

Clay pots entered for sale.
Jalgaon Lok Sabha Constituency : ‘ए.टीं’च्या गाठीभेटी; वाघांची धाकधूक!

किमतीत २० ते २५ टक्के वाढ

यंदा बाजारात मडक्यांच्या आकारानुसार २०० ते २५० रुपये, तोटी रांजण मडके ५०० ते ६०० रुपये आहेत. साहित्याचे दर वाढल्याने माठाचे दर वाढत आहेत. महागाई प्रचंड वाढत आहे. त्यामुळे काळ्या मडक्याचे भावही गगनाला पोहोचले आहेत. प्रत्येक गावात १० ते १५ कामगार काम करीत आहेत.

गावात फिरून दिवसाला १५ ते २० माठ प्रत्येक कामगार विकत आहे. ते विकून त्यांना २५ ते ३० रुपये प्रत्येक मडक्यांमागे मिळतात. हे मडके १५० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत विक्रीस आहेत. कोळसा व मातीचे भाव वाढल्यानेच मडक्यांचे भाव वाढले आहेत. मागच्या वर्षापेक्षा यंदा मडक्यांच्या किमतीत २० ते २५ टक्के दराने वाढ झाली आहे.

Clay pots entered for sale.
Jalgaon Lok Sabha Constituency : ‘ए.टीं’च्या गाठीभेटी; वाघांची धाकधूक!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com