SAKAL Exclusive : ‘राजकमल’ची शतकाकडील वाटचाल थांबली; ‘सिंगल स्क्रीन’ सिनेमागृहांची अखेरची घटिका

Jalgaon News : गेल्या दशक, दोन दशकांत सुरवातीला इंटरनेट आणि आता सोशल मीडियाच्या वापराने रसिकांचे सिनेमागृहांशी असलेले भावनिक नातंच तोडून टाकलंय.
Rajkamal Cinema in the city.
Rajkamal Cinema in the city.esakal

Jalgaon News : गेल्या दशक, दोन दशकांत सुरवातीला इंटरनेट आणि आता सोशल मीडियाच्या वापराने रसिकांचे सिनेमागृहांशी असलेले भावनिक नातंच तोडून टाकलंय. त्यामुळे एकामागून एक सिंगल स्क्रीन सिनेमागृह बंद पडताहेत. या मालिकेतीलच जळगावातील प्रसिद्ध राजकमल चित्रपटगृहदेखील बंद पडले असून, त्याचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले जातेय. (Jalgaon end of single screen cinemas)

भारतीय सिनेमाला मोठा इतिहास, वैभवशाली परंपरा आहे. अनेक निर्माता-दिग्दर्शक, अभिनेत्यांनी भारतीय सिनेसृष्टीला जगात नावलौकिक प्राप्त करून दिलांय. सुरवातीला कला, मनोरंजनाचे क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या या सृष्टीला नंतर इंडस्ट्रीचे स्वरूप प्राप्त झाले आणि त्यास हॉलीवूडच्या धर्तीवर बॉलीवूड म्हटले जाऊ लागले. मराठी कलावंतांनी व महाराष्ट्राने या सिनेसृष्टीत मोठे योगदान दिलेय.

व्ही. शांताराम (शांताराम राजाराम वणकुद्रे) यांना तर भारतीय सिनेमाचे जनक मानले जाते. व्ही. शांताराम सुरवातीला प्रभात फिल्मस्‌ या कंपनीत होते. नंतर त्यांनी स्वत:ची राजकमल कलामंदिर ही संस्था सुरू केली. नंतरच्या काळात टप्प्याटप्प्याने भारतीय सिनेमा गावागावांत, घराघरांत पोचला. शांताराम यांचे नवरंग, पिंजरासारखे काही चित्रपट कमालीचे गाजले.

‘राजकमल’ची मुहूर्तमेढ अन्‌ स्मृती

जळगाव जिल्ह्यालाही सिनेमांचा जुना इतिहास आहे. १९४० मध्ये व्ही. शांताराम यांच्याच पुढाकाराने जळगावात राजकमल सिनेमागृह सुरू झाले. त्यादरम्यान ‘माणूस’ हा पहिला चित्रपट या सिनेमागृहात दाखविण्यात आला. त्यासाठी स्वत: शांताराम यांच्या पत्नी जयश्री उपस्थित होत्या, असे जाणकार सांगतात. (latest marathi news)

Rajkamal Cinema in the city.
Jalgaon News : राष्ट्रवादी‘चे प्रा.मनोज पाटील समर्थकांसह शिंदे गटात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

नंतरच्या काळात एका चित्रपटाच्या ‘सिल्व्हर ज्युबिली’साठी स्वत: व्ही. शांताराम जळगावला येऊन गेले. चित्रा चौकापासून पुढे राजकमल सिनेमागृहाकडे जाताना त्या रस्त्यावर जो चौक लागतो, त्यास शांताराम यांचे नाव देण्यात आलेय.

‘राजकमल’ही पडले बंद

काळाच्या ओघात सिंगल स्क्रीन सिनेमागृह बंद पडू लागले. इंटरनेट आल्यापासून त्याचा जास्त परिणाम झाला. जळगावात चित्रा, नटराज, नटवर, मोहन चित्रमंदिर, असे सिंगल स्क्रीन चित्रपटगृह कधीच बंद पडलेत. नंतरच्या काळात तर सोशल मीडियाने सिनेसृष्टीवर आक्रमण केले. आता यु-ट्यूब, विविध चित्रपटांच्या वेबसाईटस्‌ आणि अलीकडेच विकसित झालेल्या वेबसिरीजने सिनेमाला गिळायला सुरवात केलीय.

या स्थितीत आता शांताराम यांच्या पदस्पर्शाने पुलकित झालेले राजकमल चित्रपटगृहही बंद पडले आहे. फेब्रुवारीपासून ते बंद असून, त्याची मालकीही बदलली आहे. नूतनीकरणासाठी ते बंद ठेवण्यात आल्याचे सांगितले जातेय. आता जळगावात सिंगल स्क्रीनवाले जुन्यांपैकी केवळ अशोक थिएटर सुरू आहे. रिगल व मेट्रो हे सिंगल स्क्रीन असले, तरी अलीकडच्या काळातील आहेत.

Rajkamal Cinema in the city.
Jalgaon News : उमेदवार बदला, अन्यथा अर्ज भरणार; माजी आमदार संतोष चौधरी यांची घोषणा

सिनेमागृहांची झाली संकुले

जळगावात जे सिनेमागृह बंद पडलेत, त्याठिकाणी व्यापारी संकुले उभी राहिली. चित्रा सिनेमागृह, नटवर थिएटरच्या ठिकाणी संकुले उभी आहेत. नटवरच्या जागी तीन पडद्यांचे ‘पीव्हीआर’ मल्टीप्लेक्स आहे. नटराज सिनेमागृह कांताई सभागृह म्हणून अस्तित्वात असून, ते जैन उद्योग समुहाकडे आहे. तर असोदा रोडवरील मोहन चित्रमंदिर ओसाड झालेय. आता राजकमल थिएटरच्या जागी काय होते, ते लवकरच समजेल.

अशीही एक आठवण

व्ही. शांताराम यांच्यानंतर त्यांच्या कंपनीचा कारभार त्यांचे भाऊ व्ही. काशिनाथ यांनी सांभाळला. शांताराम यांचे पुत्र किरण यांच्याकडेही वारशाने कंपनीचे काम आले. त्यांनी अनेक वर्षे कंपनी चालवली. किरण शांताराम व जळगावच्या राजकमल सिनेमागृहाचे संचालक तथा जळगाव जिल्हा चित्रपटगृह संघटनेचे अनेक वर्षे अध्यक्ष राहिलेले महेंद्र लुंकड मुंबईत एकाच शाळेत शिकलेले. तेव्हापासून त्यांचे ऋणानुबंध होते.

Rajkamal Cinema in the city.
Jalgaon News : कळमसरे येथे आज भवानीमातेचा यात्रोत्सव! नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com