Jalgaon News : दरवर्षी 200 एकर पडिक जमीन वहिवाटीखाली; ट्रॅक्टर, जेसीबी, अन्य यंत्रांचा वापर वाढल्याने कायापालट

Jalgaon News : खानदेशात पहिल्यापासूनच सुपीक जमीन आहे. त्याच बरोबर अनेक नद्यांच्या पाण्याचा वापर होत आहे आणि वहिवाटीखालील जमिनीबरोबरच खानदेशात जवळजवळ सर्वच तालुक्यात पडिक जमिनी आहेत.
A farm formed by breaking up a high hill.
A farm formed by breaking up a high hill. esakal

गणपूर (ता. चोपडा) : खानदेशात पहिल्यापासूनच सुपीक जमीन आहे. त्याच बरोबर अनेक नद्यांच्या पाण्याचा वापर होत आहे आणि वहिवाटीखालील जमिनीबरोबरच खानदेशात जवळजवळ सर्वच तालुक्यात पडिक जमिनी आहेत. या जमिनी अनेक वर्षे तशाच पडून आहेत. मात्र आता या जमिनी ट्रॅक्टर, जेसीबी व अन्य यंत्रांच्या साहाय्याने तयार करून वहिवाटीखाली येत आहेत. (Jalgaon Every year 200 acres of fallow land in useful condition by helping with jcb and tractor)

खानदेशात दरवर्षी सुमारे दोनशे ते अडीचशे एकर जमीन अशा प्रकारे तयार होऊ लागली असून, ती पेरणी योग्य करण्यात येत आहे. खानदेशात तीनही जिल्ह्यात उत्तर सीमेच्या सातपुडालगतच्या भागात, तापी खोऱ्यात व अन्य नद्यांच्या परिसरात बराच भाग टेकड्या व दऱ्याखोऱ्यांचा आहे.

पूर्वीच्या काळी कुठलीही साधने नसल्यामुळे या भागावर झाडी झुडुपे झाले असून, ते क्षेत्र तसेच पडून आहे. मात्र अलीकडच्या पाच, सहा दशकात नवीन यंत्रे आल्याने ट्रॅक्टर व त्यावरील कृषी अवजारांच्या मदतीने त्याचबरोबर जेसीबी, पोकलेन यांच्या साहाय्याने आता जमिनी तयार होऊ लागल्या आहेत.

जमिनीचे भाव अलीकडे गगनाला पोहोचत असल्याने पडिक असलेला हा भाग तयार करून तोच पेरणी योग्य करण्यात शेतकरी खर्च करण्यास पुढे आले आहेत. पडिक जमिनीवर कोणत्याही प्रकारचे पीक कर्ज मिळत नाही, शिवाय सातबाराच्या नोंदीवर पडिक, पोटखराब क्षेत्र असा उल्लेख दिसून येतो. (latest marathi news)

A farm formed by breaking up a high hill.
Jalgaon District Collector : काळ्या यादीतील कंत्राटदार, शिक्षा झालेल्यांचे अर्ज होणार बाद : जिल्हाधिकारी प्रसाद

मात्र अलीकडच्या काळात या जमिनी सपाट होऊन पेरणी योग्य होऊ लागल्याने व पुढे बागायती होऊ लागल्याने शासकीय स्तरावरून त्या पेरणीयोग्य जमीन या प्रकारात आणण्यासाठी शासकीय मोहीम राबविण्यात येत आहे. काही ठराविक रक्कम भरून या जमिनी वहीवाटी खालील जमिनी प्रकारात येऊ लागल्या आहेत. त्या तशा झाल्यानंतर त्यावर पीक कर्ज व लागवड झालेल्या पिकाची नोंद होऊ लागली आहे.

डोंगरदऱ्यांच्या भागावरही शेती

खानदेशात बऱ्याच भागात शेतकऱ्यांनी एकरी एक ते दीड लाख रुपये खर्च करून अशा जमिनी तयार करून घेतल्या जात आहेत. त्यातून कुटुंबाचे उत्पन्न वाढण्यासही मदत होऊ लागली आहे. सुरवातीला एक, दोन वर्ष या जमिनीवर पाहिजे तेवढे उत्पादन एक येत नसले तरी त्यावर गाळ, शेणखत, पिवळी माती टाकून त्याची प्रत (पोत, मगदूर) वाढविण्याचे प्रयोग शेतकऱ्यांकडून होत असल्याने या जमिनीमध्ये भरपूर उत्पन्न येऊ लागले आहे.

एकंदरीतरीत्या गेल्या पाच-सहा दशकापूर्वी असलेला डोंगरदऱ्यांचा, नाल्या खोल्याचा, कपारींचा, उंच टेकड्यांचा व पडिक असलेला भूभाग आता शेती म्हणून वापरात येऊ लागल्याने उत्पन्नही घेता येत येऊ लागले आहे.

A farm formed by breaking up a high hill.
Jalgaon Lok Sabha Election : आश्वासनांची खैरात, विकासाचा भुलभुलैय्या! पारोळा तालुका परिपूर्ण होण्याची प्रतीक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com