Jalgaon Tax Recovery : उत्पादन शुल्क विभाग वसुलीत ‘मालामाल’

Jalgaon News : जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागानेही उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल प्राप्त केला असून २०२२-२३ या आर्थिक वर्षात २५ कोटी १० लाख रुपये होता तो वाढून यावर्षी २९ कोटी ७८ लाख एवढा झाला आहे.
Tax Recovery
Tax Recoveryesakal

Jalgaon News : जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागानेही उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल प्राप्त केला असून २०२२-२३ या आर्थिक वर्षात २५ कोटी १० लाख रुपये होता तो वाढून यावर्षी २९ कोटी ७८ लाख एवढा झाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत महसुलात १८ टक्के वाढ झाली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिताचे उद्दीष्ट २८.५१ कोटीपेक्षा जास्त महसूल प्राप्त झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांनी दिली. (Jalgaon Excise department also achieved more revenue than target in district)

यात प्रामुख्याने नवीन अनुद्यप्ती मधून मिळणारे शुल्क, नुतनीकरण शुल्क, परदेशातून आयात मद्यावर लागणारे विशेष शुल्क आणि दंड वसुली मधून मिळालेले महसूल असल्याचे सांगून २८.५१ कोटी एवढे वार्षिक उद्दिष्ट होते. ते उद्दिष्ट पार करून २९ कोटी ७८ लाख एवढा महसूल प्राप्त झाला आहे. यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वेळोवेळी घेतलेला आढावा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील इतर अधिकारी वर्गाचे सहकार्यमिळाल्याचे डॉ. व्ही टी. भुकन यांनी सांगितले.

हातभट्टीवर प्रभावी कारवाई

जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४या कालावधीत एकूण २०२५ गुन्हे नोंदविले असून ४ कोटी १७ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करत उच्चांकी कामगिरी केली आहे. (latest marathi news)

Tax Recovery
Jalgaon News : पारोळ्यातील साचे बनविण्याच्या कलेला घरघर; जडे कुटुंबातील सातव्या पिढीची कला जिवंत ठेवण्यासाठी धडपड

या कालावधीत महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ९३ नुसार सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत उपविभागीय दंडाधिकारी यांच्या मार्फत चांगल्या वर्तणुकीचे २३४ बन्धपत्र घेण्यात आले.

जिल्ह्यात हातभट्टी वर नियंत्रण मिळवण्याचा एक भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रथम च MPDA कायदा १९८१ नुसार दोन गुन्हेगारांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने अनुक्रमे अमरावती व नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

Tax Recovery
Jalgaon News : फळ विक्रीतून 35 ते 40 तरुण झाले आत्मनिर्भर! पारोळ्यात बेरोजगारीवर मात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com