Jalgaon News : नवीन वसाहतींमधील रस्त्यांचे भाग्य उजळणार; 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Jalgaon : शहराबाहेर असलेल्या सर्व नवीन वसाहतींमधील रस्त्यांच्या कामांसाठी आमदार चिमणराव पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
Prof. Residents of new settlements while giving a statement to Manoj Patil.
Prof. Residents of new settlements while giving a statement to Manoj Patil.esakal

Jalgaon News : शहराबाहेर असलेल्या सर्व नवीन वसाहतींमधील रस्त्यांच्या कामांसाठी आमदार चिमणराव पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे लवकरच रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे, अशी माहिती युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष प्रा. मनोज पाटील यांनी दिली. येथील नवीन वसाहतींमधील रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर झाल्याने रहिवाशांची गैरसोय दूर होणार आहे. (Fate of roads in new colonies to brighten 10 crore fund approved )

नवीन वसाहतींमधील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल ‘सकाळ’ने अनेकदा वाचा फोडली होती. शहराबाहेर असलेल्या या नवीन वसाहतींत गटार व नवीन पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. त्यामुळे सर्वत्र रस्ते खोदण्यात आलेले आहेत. पावसामुळे सर्व रस्त्यांवर चिखल व गारा निर्माण झाल्याने रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे.

त्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी पसरली होती. नगरपालिका प्रशासनानेदेखील याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. रस्त्यांवरील चिखलामुळे वाहनचालक घसरून पडून वाहनांचेदेखील नुकसान होत होते. रहिवाशांनी प्रा. मनोज पाटील यांची भेट घेऊन चिखलामुळे होणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती. शिवाय वसाहतींत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याची विनंती केली होती. (latest marathi news)

Prof. Residents of new settlements while giving a statement to Manoj Patil.
Jalgaon News : शेतकऱ्यांच्या खात्यात 27 कोटी वर्ग; पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने स्थानिक नैसर्गिक आपत्तींतर्गत मदत

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील व पदाधिकाऱ्यांनी हनुमाननगर, आदर्शनगर, ओमनगर, लक्ष्मीनगर, आनंदनगर, साईनगर, इंद्रप्रस्थ कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, गांधीपुरा भागातील न्यू लक्ष्मीनगर, म्हसावद रस्त्यावरील रामदास कॉलनी यांसह सर्व नवीन वसाहतींमधील रहिवाशांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या होत्या. यावेळी रहिवाशांनी समस्यांचे निवेदन देवून रस्त्यांसह अन्य कामे करण्याची मागणी केली होती. नवीन वसाहतींमधील रस्त्यांसह सर्व समस्या सोडविण्याचे व रहिवाशांना पुरेशा प्रमाणावर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रा. पाटील यांनी नागरिकांना दिले होते.

प्रा. पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह आमदार चिमणराव पाटील यांची भेट घेवून नवीन वसाहतींमध्ये रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची माहिती देवून शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. आमदार पाटील यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे नवीन वसाहतींमधील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाच्या हद्दवाढ व वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. आमदार पाटील यांनी रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. नवीन वसाहतींमधील रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे रहिवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. इत कामांनादेखील लवकर सुरुवात करण्याची मागणी महिलांनी केली आहे.

Prof. Residents of new settlements while giving a statement to Manoj Patil.
Jalgaon News : घात, अपघात अन्यायासाठी डायल 112 वर वाढल्या तक्रारी; 11 हजारांवर नागरिकांनी मिळविली मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com