Jalgaon Fire Accident : पिंपळगाव पिंप्री येथे भीषण आगीत 6 घरे खाक; होत्याचे नव्हते झाले

Jalgaon News : पिंपळगाव पिंप्री (चौखांबे) या गावाचा विस्तारित भाग असलेल्या गिरीश महाजन नगरात मंगळवारी (ता. १७) सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान आग लागली.
Houses destroyed by fire.
Houses destroyed by fire.esakal

फत्तेपूर (ता.जामनेर) : येथून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पिंपळगाव पिंप्री (चौखांबे) या गावाचा विस्तारित भाग असलेल्या गिरीश महाजन नगरात मंगळवारी (ता. १७) सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान आग लागली. वाढते तापमान असल्यामुळे आगीने सहा घरे भस्मसात केलीत. एक ते दीड तास आगीचे तांडव सुरूच होते. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिल्यानंतर भयावह स्थिती दिसली. (Jalgaon Fire Accident)

मंडळ अधिकारी सचिन इंगळे, तलाठी आर. व्ही. सुपेकर यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार वासुदेव शिवलाल पाटील यांच्या सहा मोठ्या शेळ्या व एक पारडू, मोटारसायकल, टीव्ही संच, फ्रिज, सोफा सेट, २० क्विंटल गहू, तांदूळ एक क्विंटल यांच्यासह कडधान्य, खताच्या थैल्या, ३० प्लास्टिक पाइप जळून खाक झाले. ७० टीनपत्रे निकामी झाले.

ज्ञानेश्वर शिवलाल पाटील यांचे दोन बैल व दोन वासरं होरपळून जखमी झालेत. मक्काची कुट्टी-वैरण ८ ट्रॅक्टर, प्लॅस्टिकचे ३० पाईप, स्प्रिंकलर पाईप ३० नग, खताच्या २४ थैल्या, भुईमूग २ क्विंटल, गहू ४ क्विंटल जळून खाक झाले. ४० टिनपत्रे निकामी झालेत. संतोष शिवलाल पाटील यांचे मक्का कुटी ५ ट्रॅक्टर, खताच्या थैल्या २८ जळाल्यात.

टिनपत्रे ३५ निकामी झालेत. संजीव हरी बेटोदे यांच्या ३ मोठ्या शेळ्या होरपळून मृत्युमुखी पडल्या, गहू ५ क्विंटल, ज्वारी २ क्विंटल, कुलर, कॉट, टीव्ही संच, कपाट जळाले. टीनपत्रे २० निकामी झालेत. जीवन समाधान पाटील व प्रवीण समाधान पाटील दोघं भावांचे- सहा मोठ्या शेळ्या, गहू ३० क्विंटल, ज्वारी ५ क्विंटल, तांदूळ १ क्विंटल. (latest marathi news)

Houses destroyed by fire.
Accident News : वऱ्हाड घेवून निघालेल्या चारचाकी गाडीचा अपघात; सात जणांचा मृत्यू

तूरडाळ १ क्विंटल, मूगडाळ ५० किलो, कॉट-३, टीव्ही संच-३ जळून खाक झाले. ७० पत्रे निकामी झालेत. त्याचबरोबर अडीच इंची पाइप ४० नग, दोन इंची पाईप २० नग, चारा कुट्टी ६ ट्रॅक्टरची जळून खाक झाली. धनराज सोनजी आहेर यांचे संसारोपयोगी सर्व साहित्य, चारा कुट्टी ५ ट्रॅक्टर, ३० टिनपत्रे निकामी झालेत.

...यांनी दिली भेट

महसूलचे नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर, पोलिस स्टेशन फत्तेपूरचे स.पो.नि. गणेश फड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भारती कुरील, माजी पं.स सदस्य संजय चौधरी, सेवानिवृत्त कृषी कर्मचारी विश्वास देठे यांनी घटना स्थळी भेट दिली.

सहाचे सहा घरे टिनपत्रांची असल्यामुळे आग विझविण्यात अडचणी येत होत्या. शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

Houses destroyed by fire.
Jalgaon Fire Accident : एमआयडीसीत केमिकल कंपनीतील स्फोटात दोघांचा मृत्यू; जळगावातील दुर्घटना

...यांनी केली मदत

आग विझविण्यासाठी जामनेर नगरपरिषद व मलकापूर नगरपालिका येथून अग्निशमन बंब आले होते. तत्पूर्वी फत्तेपूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वॉटर सप्लायचे पाणी सोडले. राजीव तायडे यांनी आपल्या टँकरने पाणी पुरविले. तोरनाळे येथील सरपंच युवराज पाटील यांनी स्वतःचे पाणी भरलेले टँकर पाठविले.

राम विचवे व वासुदेव पाटील यांनी आपल्या शेतातील पाणी आग विझविण्यासाठी उपलब्ध करून दिले. रामनवमीचा कार्यक्रम असल्यामुळे सर्व गावकरी घरीच होते. म्हणून आग लवकर आटोक्यात आली. घटनास्थळी जे. के. चव्हाण, बबलू भंसाली, उपसरपंच आत्माराम गावंडे, पूना शेजुळे (सरपंच पती), ग्रामविकास अधिकारी सुरेश पाटील उपस्थित होते.

Houses destroyed by fire.
Jalgaon News : कर्जबाजारी शेतकऱ्याने चोरवड येथे उचलले टोकाचे पाऊल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com