Nitin Gadkari Orders Inquiry Into Asoda Flyover Collapse
esakal
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या व अपघातांचा वाढता धोका लक्षात घेता आकाशवाणी चौकासह इच्छादेवी, अजिंठा चौकात उड्डाणपुलासंबंधी प्रस्ताव खासदार स्मिता वाघ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे (Smita Wagh Jalgaon flyover demand) मांडला. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसंदर्भात त्यांनी सूचना केल्या. सोबतच पाळधी-तरसोद ‘बायपास’वर असोद्याजवळील उड्डाणपूल खचल्याच्या गंभीर घटनेची दखल घेत गडकरींनी या कामाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देत कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिले आहेत.