Ganesh Idol Broken News
esakal
जळगाव : गणेशोत्सवासाठी मोठ्या उत्साहात बऱ्हाणपूर येथून आणलेली १२ फूट उंचीची गणेशमूर्ती जळगावच्या वाटेवरच दुभंगल्याने नवी पेठेतील जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना स्थापनेपूर्वीच मूर्तीचे विसर्जन करण्याची वेळ आली. सुमारे ४७ हजार रुपये खर्च करून तयार करून घेतलेल्या या मूर्तीची अवस्था पाहून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धक्का बसला. मूर्ती पूर्णपणे वाळण्यापूर्वीच ती घाईघाईने ताब्यात देण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप मंडळाने केला आहे.