गँगवारच्या वाटेवरील 'जळगावात' गोळीबार?

झाकिर हुसेन कॉलनीत पहाटेचा थरार; दगडफेक, सशस्त्र हल्ला
Jalgaon Gangwar Shooting Zakir Hussain Colony
Jalgaon Gangwar Shooting Zakir Hussain Colonysakal

जळगाव : शहरातील महाबळ कॉलनीच्या पुढील झाकिर हुसेन कॉलनीतील नलिनी तायडे यांच्या घरावर टोळक्याने पहाटे पावणेतीनच्या सुमारास सशस्त्र हल्ला चढविला. यात घराबाहेर उभ्या दुचाकी फोडण्यात आल्या. जळगाव शहर पुन्हा एकदा गँगवार (टोळीयुद्ध) च्या वाटेवर जात असल्याच्या चर्चेने या घटनेतून जोर धरला आहे.

झाकिर हुसेन कॉलनीत नलिनी विलास तायडे मुलगा विनोद, सतीश आणि कुटुंबासह वास्तव्यास आहेत. तायडे कुटुंबाचे परिसरात बऱ्यापैकी वर्चस्व असून, यापूर्वीही त्यांच्या घराजवळ हाणामारीच्या घटना घडल्‍या आहेत. त्यांच्या विरोधातील गटाशी झालेल्या हल्ला प्रतिहल्ल्याचे गुन्हेही दाखल होते.

पहाटेचा थरार

बुधवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास तायडे कुटुंबीयांच्या घराबाहेर वाहनांमधून टोळके आले. काही कारण नसताना त्यांनी शिवीगाळ करून घराच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरवात केली. तायडे यांच्या घराबाहेर उभ्या एका विनाक्रमांकाच्या दुचाकीसह (एमएच १९, डीएच ००४१) अशा दोन वाहनांवर लाकडी दांडके व दगडांनी मारा करून फोडल्या. नलिनी तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर टोळके त्यांचा मुलगा विनोद आणि सतीश तायडे यांना मारण्याच्या उद्देशाने आले होते. मात्र, दोन्ही मुले लग्नानिमित्त गावी गेल्याने घरी कोणीही नव्हते.

गोळीबाराची दोन छिद्रे?

तायडे यांच्या घराच्या अंगणातून वरच्या मजल्यावर जात असलेल्या जिन्याच्या भिंतीवर साधारण अडीच मीटरच्या अंतरात दोन गोळीच्या आकाराची छिद्रे पडली असून, हे छिद्र नेमकी गोळीबारातूनच झाली की कशी, याबाबत अद्याप साशंकता असून, पोलिस घटनास्थळावर पाहणी करून गोळीबाराबाबत पुरावे शेाधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पोलिसांत तक्रार...

याप्रकरणी नलिनी तायडे यांनी रामानंदनगर पोलिसांत आबा आणि अश्विन नामक व्यक्तीविरोधात तक्रार दिली आहे. त्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. घराबाहेर फटाक्यांसारखा आवाज येत होता आणि घराच्या जिन्यावर दोन छिद्रे पडली असल्याने कदाचित गोळीबार झाला असावा, असा अंदाज तायडे यांनी व्यक्त केला आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

गोळीबाराचा इन्कार

घटनेची माहिती कळताच निरीक्षक विजय शिंदे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पाठोपाठ सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरात त्यांनी स्वतः चौकशी केली असता, गोळीबार झाला नसल्याची माहिती मिळाली. गोळीबार झाल्याबाबत फिर्यादीही ठामपणे सांगू शकत नाही, असे श्री. चिंथा यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com