Jalgaon Gold Rate : सोन्याने गाठला 70 हजारांचा टप्पा

Jalgaon Gold Rate : सोन्याच्या बाजारात शुक्रवारी (ता.२९) ऐतिहासिक घटना घडली. सोन्याने प्रती तोळा (दहा ग्रॅम) ‘जीएसटी’सह ७० हजारांचा टप्पा पार केला आहे.
Gold Rate
Gold Rate esakal

Jalgaon Gold Rate : सोन्याच्या बाजारात शुक्रवारी (ता.२९) ऐतिहासिक घटना घडली. सोन्याने प्रती तोळा (दहा ग्रॅम) ‘जीएसटी’सह ७० हजारांचा टप्पा पार केला आहे. सुवर्ण बाजारातील या उच्चांकांमुळे सर्वजण चक्रातून गेले आहेत. एकीकडे लग्न सराई, दुसरीकडे आगामी काही दिवसांत लोकसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने आगामी काळात सोन्याचे महत्त्व अधिकाधिक अधोरेखित होणार आहे. (Jalgaon Gold crossed 70 thousand marks with GST per tola)

पाच ते २९ मार्च या कालावधीतील सोन्याच्या बाजाराचे चित्र पाहता पंचवीस दिवसांत सोन्याच्या दरात सहा हजारांची वाढ तर चांदीच्या दरात तीन हजारांची वाढ झाली आहे. एका महिन्यात एवढा मोठा परतावा सोने, चांदीने दिल्याने गुंतवणूकदार सोने, चांदी खरेदीकडे वळले आहेत. लग्नसराई, आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीमुळे वाढ झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात चांदीचा दर ७२ हजार ५०० रुपये प्रति किलो इतका होता. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली होती. जानेवारीच्या अखेर आणि फेब्रुवारीच्या सुरवातीला ग्राहकांच्या खिशावर भार पडला. २६ फेब्रुवारीस सोने ६२ हजार ४०० होते तर चांदी ७१ हजारांवर होती. (latest marathi news)

Gold Rate
Jalgaon Tax Recovery : पारोळा पालिकेच्या मालमत्ता करवसुलीला वेग

पाच मार्चला सोन्याचे दर ६४ हजार ३०० तर चांदीच्या दर ७३ हजारांवर (विना जीएसटी) होते. गुरुवारपर्यंत (ता.२८) सोने ६६ हजार ३०० तर सोने ७५ हजार (विना जीएसटी) होते. सोन्याच्या दरात दोन हजारांची वाढ तर चांदीच्या दरात तीन हजारांची वाढ झाली आहे. ‘जीएसटी’सह सोने प्रती तोळा ७० हजार ४० तर चांदी ७८ हजार २८० वर पोचली आहे.

सोन्याचे काही दिवसांतील दर (विना जीएसटी)

तारीख--सोने (प्रती तोळा)--चांदी (प्रती किलो)

५ मार्च-- ६४ हजार ३००- ७३ हजार

२३ मार्च--६६ हजार २००--७५ हजार

२८ मार्च -६६ हजार ३००--७५ हजार

२९ मार्च--६८ हजार २००--७६ हजार

Gold Rate
Jalgaon News : अजित पवार गटाचा आज जिल्हा मेळावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com