Jalgaon gold price
esakal
जळगाव : पितृपक्षात शुभकार्ये केली जात नाहीत. त्याबरोबरच मोठ्या वस्तूंची खरेदीही केली जात नाही. पितृपक्षाचा सुवर्णबाजारापेठेवर विपरीत परिणाम झाला आहे. गेल्या २७ सप्टेंबरला पितृपक्ष सुरू (Jalgaon gold price) झाला. तेव्हापासून सोने, चांदीचे भाव सातत्याने कमी होत आहेत. ग्राहकांनी, गुंतवणूकदारांनी सोने- चांदी खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र सुवर्णबाजारपेठेत पाहावयास मिळते. मात्र, आगामी नवरात्रोत्सव, नंतर येणारा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला विजयादशमी (दसरा) यादिवशी सोने- चांदीत मोठी उलाढाल होईल, अशी आशा सुर्वण व्यावसायिकांना आहे.