Jalgaon Onion News : चाळीतला कांदा, करतोय वांदा! शासनाच्या निर्णयाने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

Jalgaon News : शासनाचे धोरण व मे महिन्यात पडलेले रेकोर्डब्रेक ऊन, यामुळे चाळीतल्या कांद्यांत सड पडू लागली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता हैराण झालेले दिसून येत आहेत.
An onion kept in a storage in the hope of getting a price.
An onion kept in a storage in the hope of getting a price.esakal

गणपूर(ता. चोपडा) : खानदेशात गेल्या मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत निघालेला उन्हाळी कांदा शेतकऱ्यांनी भाव मिळेल, या आशेने चाळीत भरून ठेवला खरा. मात्र, शासनाचे धोरण व मे महिन्यात पडलेले रेकोर्डब्रेक ऊन, यामुळे चाळीतल्या कांद्यांत सड पडू लागली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता हैराण झालेले दिसून येत आहेत. मधल्या काळात दक्षिणेतील बंगळुरू रोज या कांद्यावरील ४० टक्के शुल्क केंद्र शासनाने हटवले. (Government policy and record breaking heat in May caused onions to rot)

त्याचप्रमाणे गुजरातच्या कांद्यासाठीही बंधने कमी करून निर्यात खुली केली. मात्र, महाराष्ट्रातील कांद्याला केंद्र शासनाकडून अजूनही न्याय मिळत नाही. देशात सर्वात अधिक कांदा पिकविणाऱ्या नाशिक झोनमधील असंख्य कांदा उत्पादक शेतकरी या निर्णयांनी जेरीस आलेले आहेत. आता मोठे आंदोलन उभे राहण्याची तयारी होऊ लागलेली आहे.

खरे म्हणजे भाव मिळेल, या आशेने शेतकरी उन्हाळी कांदा व्यवस्थित स्वच्छ करून चाळीमध्ये भरून ठेवतात. या कांद्याची निगाही खूप ठेवतात. काही काळानंतर त्याचे स्वार्टिंग केले जाते. मात्र, यावर्षी उन्हाचा पारा इतका चढला की, पारामापी चुकीची आहे की काय, असे वाटू लागले आणि त्यातच या कांद्याचा पार खुर्दा झाला.

त्यामुळे भरून ठेवलेला कांदा व विक्री करताना चाळीतून निघालेला कांदा यांचा मेळ जमणेही कठीण झाले आहे. दुसऱ्या अर्थाने उत्पादन व उत्पन्न याचे गणित गणिततज्ज्ञालाही बसविता येणे शक्य होत नसल्याचे कांदा उत्पादकांच्या चर्चेतून दिसून आले आहे. (latest marathi news)

An onion kept in a storage in the hope of getting a price.
Jalgaon Lok Sabha Constituency : राजकारणात मैत्री जपत मित्राला केले आमदार, खासदार

दोनशे ते अडीचशे रुपयांची घसरण!

खरे म्हणजे उन्हाळी कांदा निघाला त्या वेळेस जे भाव होते, तेच भाव थोड्याफार फरकाने मागे पुढे टिकून राहत असल्याने शेतकरी हा कांदा अधिक भाव मिळेल, या आशेने चाळीत भरून ठेवला असला तरी त्यासाठीचा भाववाढीचा आशेचा किरण अजूनही शोधावा लागत आहे.

आजच्या घडीला कांदा लिलाव सुरू झाले असताना दोनशे ते अडीचशे रुपयांची घसरण राज्यातील बाजारात दिसून आली. त्यामुळे शेतकरी पुन्हा विवंचनेत सापडल्याचे चित्र दिसून आले आहे.

An onion kept in a storage in the hope of getting a price.
Jalgaon News : लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगीनघाई; सोमवारच्या आठवडे बाजारात गावरान कैऱ्या झाल्या आंबट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com