Jalgaon News : जळगावचे हलव्याचे दागिने पोचले आयर्लंडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon: Anagha Dohole while making halwa ornaments

Jalgaon News : जळगावचे हलव्याचे दागिने पोचले आयर्लंडला

जळगाव : विदेशात राहूनही आपल्या संस्कृती व परंपरा संवर्धनाचे कार्य अविरत सुरू ठेवणारे अनेक कुटुंबीय आहेत. अशाच आयर्लंडमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेला तिच्या मुलुंड येथील रहिवासी आईने हलव्याचे दागिने पाठविले आहेत. विशेष म्हणजे, जळगावातील अनघा डोहोळेंनी हे दागिने तयार केलेत.

जळगाव येथील डोहोळे परिवारात गेल्या ७० वर्षांपासून (कै.) उमा उपेंद्र डोहोळे यांच्यापासून त्यांची नातसून अनघा अजय डोहोळे या तिसऱ्या पिढीपर्यंत हाताने हलव्याचे दागिने तयार करण्याची परंपरा कायम आहे. (Jalgaon Halwa ornaments reached Ireland Jalgaon News)

हेही वाचा: Nashik News : उद्यानातील खेळण्या चोरट्यांकडून लंपास; मृत्युंजय महादेव मंदिर उद्यानाची दुरवस्था!

आयर्लंडला पोचले दागिने

यंदा मुलुंड येथील सुनीता सतीश बिडवई यांनी आयर्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या नवविवाहित मुलगी आदिती अंकुर त्रिपाठी हिच्या संक्रांती सणासाठी अनघा डोहोळे यांनी तयार केलेले हलव्याचे दागिने घेऊन तिकडे पाठविले आहेत.

सुनीता बिडवई यांचे आजोळ जळगावचे असल्यामुळे उमा डोहोळे या स्वतः हाताने ५० किलोपर्यंतचा हलवा बनवून महिला सहकारी मंडळास विकत देत असतं आणि त्यांची मुलगी (कै.) शालिनी पानट व नात मीनाक्षी कुलकर्णी या दोघी हलव्याचे दागिने तयार करीत असतं, याची त्यांना माहिती होती.

सोशल मीडियातून डोहोळे परिवाराची तिसरी पिढी ही परंपरा पुढे चालवीत असल्याची त्यांना माहिती मिळाली.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

हेही वाचा: Nagpur News: भारतीय ज्ञानभाषा संस्कृत दारादारात पोहोचावी

दागिन्यांचे गेले कुरिअर

बिडवई यांनी अनघा यांच्याशी संपर्क साधून विदेशात असलेल्या आपल्या मुलीसाठी मंगळसूत्र, राणीहार, तनमणी, बांगड्या, तोडे, ठुशी, कंबरपट्टा, बाजूबंध, नथ, झुबे, बिंदी आणि जावईंसाठी हलव्याचे दागिने मागणीप्रमाणे तयार करून घेतले व ते आयर्लंडला पाठविले.

"कलेची आवड असल्याने सासरी हलव्याचे दागिने तयार करण्याचे मी स्वतः शिकून घेतले. आज मी तयार केलेले हलव्याचे दागिने विदेशात गेल्यामुळे माझ्या आजेसासूंपासूनचा परिश्रमाचा वारसा समृद्ध झाला आहे."

-अनघा डोहोळे

हेही वाचा: Jalgaon News : वाहतुकीचे रस्ते अतिक्रमणाने भरले; पदाधिकारी, नगरसेवकांचाही आशीर्वाद?