Jalgaon Accident: कल्याणीनगरनंतर आता जळगाव अपघात प्रकरणी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये! बिल्डर अन् NCP जिल्हाध्यक्षांच्या मुलाला १८ दिवसांनंतर घेतलं ताब्यात

Jalgaon Hit and Run Case: पुण्यातील कल्याणीनगर भागातील हिट अँड रन केसनंतर आता जळगाव हिट अँड रन प्रकरणात चर्चेत आलं आहे. १८ दिवसांनंतर जळगाव हिट अँड रन प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.
Jalgaon Hit & Run Case
Jalgaon Hit & Run CaseEsakal

Jalgaon Hit and Run Case: पुण्यातील कल्याणीनगर भागातील हिट अँड रन प्रकरण चांगलंच चर्चेत आलंय. एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलानं नशेत भरघाव वेगात आलीशान अशा पोर्श गाडीनं दोघांना चिरडलं. १९ मे रोजी पहाजे अडीचला ही घटना घडली. पण घटनेच्या १५ तासात किरकोळ कलम लावून त्या आरोपीला जामीन दिला आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळेच या प्रकरणानं नवं वळणं घेतलं आणि आता आरोपी बाल सुधार गृहात आणि १७ वर्षांच्या मुलाला इतकी सुट दिल्यामुळे त्याचे वडिल आणि आजोबा पोलीसांच्या ताब्यात आहेत.

प्रकरण जितकं दाबण्याचा प्रयत्न केला तितकंच आता या प्रकरणाने डोकं वरं काढलंय. त्यामुळे आता राज्यातील पोलीस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आलं. कारण पुण्याआधी काही दिवसांपुर्वीच जळगावमध्ये हिट अँड रन प्रकरण घडलेलं. यातही एक बिल्डरचा तर दुसरा पुढाऱ्याचा मुलगा होता पण पुण्याच्या प्रकरणानं धडा घेतला आणि १८ दिवसांनंतर का होईना या जळगाव अपघातातील आरोपींना बेड्या ठोकल्या.

Jalgaon Hit & Run Case
Pune Porsche Accident : "पोलीस महानालायक असतात..."; पुण्यातील पोर्शे गाडी अपघाताबाबत केतकीनं शेअर केला व्हिडीओ

पुण्यातील कल्याणीनगर भागातील हिट अँड रन केसनंतर आता जळगाव हिट अँड रन प्रकरणात चर्चेत आलं आहे. १८ दिवसांनंतर जळगाव हिट अँड रन प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना मुंबईमधून अटक करण्यात आली आहे. जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा मुलाला आणि एका बिल्डरच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. भरधाव कारच्या धडकेत एका महिलेसह तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणात तब्बल १८ दिवसांनंतर कारवाई करण्यात आली आहे.

Jalgaon Hit & Run Case
Pune Porsche Accident : कल्याणीनगरमधील दुर्घटनेनंतर पुणे महानगरपालिकेची तीन बड्या हॉटेलसह तब्बल 54 ठिकाणी कारवाई

जळगावात ८ मे रोजी एका कारने एका दुचाकीला धडक दिली होती. या घटनेत राणी चव्हाण यांच्यासह त्यांच्या तीन मुलांचा मृत्यू झाला. ज्या कारने दुचाकीला घडक दिली त्या कारमधील एक आरोपी मुलगा हा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांचा मुलगा आहे. तर दुसरा आरोपी मुलगा हा अभिषेक कौल नावाच्या बिल्डरचा मुलगा आहे. अपघातावेळी कारचालक आणि कारमधील इतर जण दारूच्या नशेत होते.

त्याचबरोबर ज्या कारने धडक दिली त्या कारमध्ये गांजा देखील सापडला आहे. अपघातानंतर जमावाने कारमधील आरोपींना मारहाण केली होती. मारहाणीचे कारण देत पोलिसांनी आरोपींना मुंबईतल्या रूग्णालयात भर्ती केलं होतं. यानंतर यासंबधीच्या बातम्या समोर आल्यानंतर दोन्ही आरोपींना मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं आहे.

Jalgaon Hit & Run Case
Pune Porsche Accident: पोर्शे गाडीच्या कॅमेऱ्यातील अपघाताचा व्हिडीओ तपासणार; कल्याणीनगर अपघात प्रकरणी अतिरिक्त पोलिस आयुक्तांची माहिती

याबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार याला ताब्यात घेतले आहे. दोघांवर मुंबईत उपचार सुरू होते. त्यांच्यावर याआधी कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासोबतच आम्ही एनडीपीएस गुन्हा दाखल केला आहे. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेचच ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांना घेऊन पोलीस जळगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. तब्बल १८ दिवसांपुर्वी हा अपघात झाला होता.

Jalgaon Hit & Run Case
Pune Porsche Accident: दोघा न्यायाधीशांची सहीच नाही? कल्याणीनगर अपघात प्रकरणातील बाल न्याय मंडळाच्या निकालावर पोलिसांचा आक्षेप

सायंकाळी सहा वाजता आरोपींना सोबत घेवून पथक जळगाव शहरात पोहोचणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. दोन्ही आरोपींना उद्या न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले आहे. मयत कुटुंबीयांच्यावतीने आरोपी नशेत असल्याचा आरोप करण्यात आल्याने दोघा आरोपींचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल उद्या प्राप्त होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

४ दिवसांपूर्वी पुण्यामध्येही अशाच प्रकारच्या एका घटनेची पुनरावृत्ती झाली. या दोन्ही घटनांनी महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. रामदेववाडी येथील घटनेला १८ दिवस उलटले तरी संशयित आरोपींना पोलिसांनी अजून अटक केलेली नव्हती. आज त्यांना अटक करण्यात आली आहे.

Jalgaon Hit & Run Case
Pune Porsche Accident: दोघा न्यायाधीशांची सहीच नाही? कल्याणीनगर अपघात प्रकरणातील बाल न्याय मंडळाच्या निकालावर पोलिसांचा आक्षेप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com