Cotton Crop
Cotton Crop esakal

Jalgaon Cotton News : यंदा साडेपाच लाख हेक्टरवर कापसाचा पेरा; चांगल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

Jalgaon News : राज्यात यंदा समाधानकारक मान्सून असल्याचा दावा हवामान विभागाने केला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Jalgaon Cotton News : राज्यात यंदा समाधानकारक मान्सून असल्याचा दावा हवामान विभागाने केला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. चांगल्या पावसाच्या आशेने चांगले उत्पादन येईल. यामुळे शेतकऱ्यांनी यंदाही कापसाचा पेरा साडेपाच लाख हेक्टरपेक्षा अधिक करण्याचे ठरविल्याचे दिसत आहे. (Jalgaon Hoping for good rains farmers have decided to sow more than five and half lakh hectares of cotton this year as well)

यंदा कापसाला अगोदर साडेआठ हजारांपर्यंत. नंतर कापसाच्या उपलब्धतेनुसार कापसाच्या दरात घट होत गेली. सध्या साडेसहा हजारांपर्यंत कापसाला भाव मिळाला. मागील वर्षी पाच लाख एक हजार ५६८ हेक्टरवर कापसाचा पेरा अपेक्षित होता. तो शेतकऱ्यांनी पाच लाख ४१ हजार ५६५ पर्यंत केला होता. तो १०८ टक्के होता. त्या खालोखाल मक्याचा ७४ हजार हेक्टरवर पेरा झाला होता.

मागील वर्षी जिल्ह्यात २६ जूनपर्यंत पावसाचे आगमन झाले नव्हते. मात्र, ६ जुलैपासून शहरासह जिल्ह्यात चांगल्या पावसाने हजेरी लावली होती. यामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना चांगलाच वेग आला. २३ दिवसांत जिरायती कापसासह, ज्वारी, मका, बाजरी, तूर, मूग, उडदाच्या पेरण्या झाल्या. काही शेतकऱ्यांनी उडीद, मुगाचा पेरा करणे टाळले, तर काहींनी पेरणी केली.

इतर शेतकऱ्यांनी कपाशीचा पेरा अधिक केला होता. असे असले तरी अगोदर अत्यल्प पाऊस. नंतर पावसाचा धुमाकूळमुळे कापसाचे उत्पादन अल्प आले. अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडी आलेले उत्पादन अतिवृष्टीने वाया गेले होते. (latest marathi news)

Cotton Crop
Jalgaon News : वाकडी धारणातून बेसुमार पाण्याचा उपसा; 30 टक्केच साठा

२०२२ च्या हंगामात कापसाला १० ते १३ हजार प्रतिक्विंटल भाव मिळणे अपेक्षित होते. मात्र, शेतकऱ्यांना साडेसात ते साडेआठ हजारांच्या आतच भाव मिळाला. चांगला दर मिळेल, म्हणून शेतकऱ्यांनी घरात कापूस ठेवला. मात्र, मार्च अखेरपर्यंत दर सहा हजार रुपयांपर्यंत मिळाला.

दर कमी मिळाला असताना, २०२३ च्या खरीप हंगामातही जिल्ह्यातील कापूस लागवड सव्वापाच लाख हेक्टरवर पोचली होती. प्रमुख नगदी पीक म्हणून शेतकरी कापसाकडे पाहतात. अर्थात कापसाला जिल्ह्यात पर्यायी पीक शेतकऱ्यांना मिळालेले नसल्याचे यातून दिसते.

शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. शेतात वखरणी, काडीकचरा वेचणी, अशी कामे केली आहेत. बी.टी. कपाशीचे वाण केव्हा बाजारात येते व आपण पेरण्या केव्हा करतो, असे बागायतदार शेतकऱ्यांना झाले आहे.

Cotton Crop
Jalgaon News : राजकारणापलीकडे जाऊन ज्येष्ठांप्रति आदराचे दर्शन! विमानतळावर नेते-पदाधिकाऱ्यांची मांदियाळी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com