Jalgaon News : औद्योगिक वसाहतीतील कंपन्या असुरक्षित; चोरीच्या घटनांमध्ये वाढ

Jalgaon : औद्योगिक वसाहत परीसरातील कारखाने कंपन्या आणि उद्योगांमध्ये भुरट्या चोऱ्यांसह कारखाने फोडून माल लांबविण्याच्या घटना मागील काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे.
MIDC
MIDC esakal

Jalgaon News : औद्योगिक वसाहत परीसरातील कारखाने कंपन्या आणि उद्योगांमध्ये भुरट्या चोऱ्यांसह कारखाने फोडून माल लांबविण्याच्या घटना मागील काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. या चोऱ्यांमुळे येथील उद्योजक त्रस्त झाले असून कंपनी असुरक्षित बनल्या आहे. या चोरांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी येथील उद्योजक आता करू लागले आहे. (Jalgaon Increase in cases of unsecured theft of companies in industrial estate )

शहरातील जीवन नगरातील रहिवासी लोकेश प्रकाश पाटील (वय )यांचे एमआयडीसीतील ई सेक्टरमध्ये गुरूकृपा इंडस्ट्रीज नावाची कंपनी असून चेरी बनविण्याचे काम केले जाते. शनिवारी (ता. १३) रोजी सकाळी ११ ते बुधवार १७ एप्रिल रोजी दुपारी ३ दरम्यान त्यांची कंपनी बंद असताना चोरट्यांनी कंपनीच्या मुख्य दरवाजाचे लोखंडी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कंपनीतून ६४ हजार २४२ रुपये किमतीच्या विद्युत मोटारींची चोरी केल्या आहेत. कंपनीत चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चोऱ्यांमध्ये वाढ

औद्योगिक वसाहत परिसरात गेल्या सहा महिन्यात भुरट्या चोऱ्यांसह कंपन्या फोडण्याचे प्रमाण वाढले आहेत. कंपनीत काम करणारे कामगारांचा पगार होताना त्यांना चाकूचा धाक दाखवुन लूटमारीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. बहुतांश कंपन्यांमध्ये परप्रांतीय गोरगरीब मजुर कामाला असून लूटमार झाल्यावरही त्यांच्याकडून तक्रारी होत नाही.

MIDC
Jalgaon Crime News : खून खटल्यात फिर्यादीवर दहशत माजविण्याचा प्रयत्न

तर, कारखाने बंद असल्याचा दिवस गाठून चोरट्यांकडून कंपन्या फोडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. एमआयडीसी परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी उद्योजक यांच्याकडून करण्यात येत असून रस्तालूट करणार्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे.

सीसीटीव्ही निरुपयोगी..

अनेक उद्योजकांनी आपल्या कंपनीमध्ये सीसीटीव्ही लावले आहेत. कंपनीत चोरट्यांकडून चोरी करताना ते सीसीटीव्ही टिपले देखील जातात. मात्र, बहुतांश वेळी त्यांचे चेहरेच येत नाहीत. तर, ज्या ठिकाणी चांगले कॅमेरे आहेत. त्या कंपन्यांमधून डिव्हीआरच चोरुन नेले जात आहे.

MIDC
Jalgaon Crime News : मिरवणुकीतील वादातून एकावर चाकूहल्ला; किनगावात परस्परविरुद्ध गटांकडून 11 जणांवर गुन्हे दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com