Jalgaon: कापूस व्यापाऱ्याचे सात लाख लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

जामनेर : कापूस व्यापाऱ्याचे सात लाख लुटले

पहूर/जामनेर : चाकू व गावठी पिस्तूलाचा धाक दाखवून पहूर-सोनाळा मार्गावर सोनाळा येथील कापूस व्यापाऱ्याचे सात लाख रुपये लुटल्याची घटना बुधवारी (ता. २४) सकाळी आठच्या सुमारास घडली.

सोनाळा येथील कापूस व्यापारी संजयण पाटील (वय ४८) नेहमीप्रमाणे दुचाकीवरून मुलांसोबत कापूस व्यापारासाठी पहूरकडे येत होते. जामनेर-पहूर मुख्य रस्त्यावरील पप्पू टी सेंटर येथून सोनाळा गावाकडे जाणाऱ्या लहान रस्त्यावर अवघ्या २०० मीटर अंतरावर संजय पाटील यांच्या दुचाकीचा दोन दुचाकींवरील चार अनोळखी गुंडांनी पाठलाग केला. चाकू व गावठी कट्टयाचा धाक दाखवून त्यांच्याजवळील थैलीतील सुमारे सात लाख रुपयांची रोकड हिसकावून पोबारा केला.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

घटनेची माहिती मिळताच पहूरचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपअधीक्षक भरत काकडे यांनी पाहणी करून घटनेचा मागोवा घेतला. जळगाव स्थानिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, घटनास्थळी श्‍वास पथकास पाचारण करण्यात आले. मात्र, श्‍वान चोरट्यांचा माग काढू शकला नाही.

या गुन्ह्याच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, कापूस व्यापारी संजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय बनसोड तपास करीत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीती व्यक्त होत आहे.

गावठी कट्टे येतात कुठून?

अधूनमधून गावठी कट्टे तरुणांजवळ आढळून येतात. या कट्ट्यांचा धाक दाखवत रस्तालुटीचे प्रकार घडतात. गावठी कट्टे येतात कुठून? कोणाच्या मेहरबानीने कट्ट्यांचा व्यवहार होतो, असे प्रश्न सामान्य नागरिकांना पडले आहेत.

loading image
go to top