Jalgaon News : 300 चौरस फुटांपर्यंत मिळकतींना घरपट्टी माफीचा ठराव मंजूर करा : जयश्री महाजन

Jalgaon : शहरातील तीनशे चौरस फुटापर्यंत घर असलेल्या मिळकतधारकांना घरपट्टी माफ करण्याचा ठराव महासभेने मंजूर केला आहे.
Former Mayor Jayashree Mahajan
Former Mayor Jayashree Mahajan esakal

Jalgaon News : शहरातील तीनशे चौरस फुटापर्यंत घर असलेल्या मिळकतधारकांना घरपट्टी माफ करण्याचा ठराव महासभेने मंजूर केला आहे. परंतु तो महापालिका प्रशासनाने विखंडनासाठी पाठविला आहे. मंत्री गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून अंदाजपत्रकात त्याची तरतूद करावी व शहरातील गरीब जनतेला दिलासा द्यावा, तसेच प्रलंबीत एमआयडीसी व नवीन कृषी विद्यापीठाचा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी माजी महापौर जयश्री महाजन यांनी पत्रकार परिषदेत केली.

पद्‌मालय विश्रामगृहात गुरुवारी (ता.२२) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना जयश्री महाजन म्हणाल्या, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकरच होणार आहे. त्या दृष्टीने जळगाव शहरातील काही मंजुरीचा प्रश्‍न आहे.

त्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा केल्यास हे प्रश्‍न सुटणार आहेत. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे यांनी त्यांचा पाठपुरावा करून राज्याच्या अर्थसंकल्पात त्याचा सामावेश करावा.

तीनशे फुटापर्यंत घरपट्टी माफ करा

महापालिका निवडणूक काळात शहरातील नागरिकांना तीनशे चौरस फुटाच्या घरांना घरपट्टी माफ करण्यात येईल, असे आश्‍वासन भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहिरनाम्यात दिले होते. शिवसेना (ठाकरे गटाची)सत्ता आल्यानंतर आम्ही पाचशे चौरसफुटाच्या घरांना घरपट्टी माफ करावी, असा प्रस्ताव आणला.

परंतु त्या प्रस्तावाला भाजपनेच विरोध केला. परंतु त्यांना जाहिरनाम्याची आठवण दिल्यावर त्यांनी तीनशे चौरसफुटाचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. परतु महापालिका प्रशासनाने तो खंडीत करण्यासाठी शासनाकडे पाठविला आहे.

Former Mayor Jayashree Mahajan
Jalgaon News : विनापरवानगी बैलगाडी शर्यतीवर गुन्हा : जिल्हाधिकारी

राज्यात भाजप महायुतीचे शासन आहे, त्यामुळे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व आमदार भोळे यांनी आपल्या शासनाला सांगून हा प्रस्ताव खंडीत न करता मंजूर करून जळगावातील गरीब जनतेला दिलासा द्यावा

विस्तारीत औद्यौगिक वसाहत प्रश्‍न सोडवा

जळगाव शहरात नवीन उद्योग यावेत यासाठी विस्तारीत औद्यौगिक वसाहतीची आवश्‍यकता आहे. त्यामुळे या प्रश्‍नाकडेही लक्ष देवून त्वरीत त्याला मंजूरी आणावी. नवीन उद्योग आल्यास शहरातील बेरोजगारांचा प्रश्‍न सुटणार आहे. तसेच शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे,

नवीन कृषी विद्यापीठाला मंजुरी द्यावी

आमदार एकनाथराव खडसे कृषी मंत्री असतांना जळगाव शहरात नवीन कृषी विद्यापीठ स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली होती. तसेच त्यासाठी शिरसोली भागात जागाही निश्‍चित करण्यात आली होती. त्यांचे मंत्रीपद गेल्यानंतर हा प्रश्‍न प्रलंबीतच राहिला. त्यामुळे शासन दरबारी पाठपुरावा करून जळगावात कृषी विदयापीठाला मंजूरी द्यावी, जिल्ह्यातील केळी, कापूस पिकासाठी हे विद्यापीठ वरदान ठरणार आहे.

भाजप अन्‌ निवडणूक जुमला

भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणूक जाहिरनाम्यात तीनशे चौरस फुटाच्या घराना घरपट्टी माफ करण्याची ग्वाही दिली होती. महासभेत त्यांचे बहुमत होते, आमदार भोळेंच्या पत्नी सीमा भोळे महापौर होत्या.त्यांनी आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे हा त्यांचा निवडणूक जुमला असल्याचे दिसत आहे. परंतु आता तरी शासन दरबारी असलेला ठराव मंजूर करून जनतेचे अश्‍वासन पूर्ण करावी, असेही मत महापौर जयश्री महाजन यांनी व्यक्त केले.

Former Mayor Jayashree Mahajan
Jalgaon Municipality News : सारं काही खोटं.. पार्किंग सुविधा, रॅम्प सर्वच नकली!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com