Ladki Bahin scheme fraud in Maharashtra
esakal
जळगाव : शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गृहिणीला शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर प्रकार घडला (Jalgaon KYC scam sexual harassment case) आहे. सलग दुसऱ्या दिवशी एकाच प्रकारच्या दोन वेगवेगळ्या संशयितांविरुद्ध महिलांनी तक्रारी दिल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. ‘केवायसी’च्या नावे महिलांच्या इभ्रतीवर घाला घालण्याचे गंभीर प्रकार घडू लागले असून, शासन व प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आता निर्माण झाली आहे.